

पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाचे जनक डॉ. अब्दुल कादीर खान (Dr Abdul Qadeer Khan) यांचे निधन झाले. इस्लामाबादमध्ये त्यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. पाकिस्तानी माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे गंभीर परिस्थितीमुळे कोरोना वॉर्डमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.
त्यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार २६ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने केआरएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. अब्दुल कादीर खान यांना पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाचे जनक समजले होते.