‘चिकन खाल्याशिवाय कोरोना सेंटर सोडणारच नाही’ | पुढारी

'चिकन खाल्याशिवाय कोरोना सेंटर सोडणारच नाही'

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पलुस येथील नगरपरिषदेची निवडणूक चार महिन्यांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे येथील सौम्य लक्षणे असणाऱ्या पेशंटची येथील कोरोना केअर सेटरमध्ये शाही बडदास्त ठेवण्यात येत आहे. अंडी, मटण, यासह फळे भाजीपाला युक्त सकस पोषक आहार देण्यावर कोरोना केअर सेंटरवर भर देण्यात येत आहे.  

मात्र या बडदास्तीची सवय लागलेले रूग्ण कोरोना सेंटर सोडायला तयार नाहीत. असाच एक प्रकार पलुस येथील काँग्रेस नगरसेवकांनी सुरु केलेल्या डॉ. पतंगराव कदम कोवीड केअर सेंटरमध्ये पहायला मिळाला. 

डिस्चार्ज मिळालेला एक रूग्ण चक्क येथे चिकन खाल्ल्याशिवाय जाणार नाही म्हणून नाचायला लागला. इतर दाखल रूग्णांनी त्याचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं इथल्या चिकनप्रेमी रूग्णाची चर्चा शहरात चवीने चर्चिली जात आहे.

 

https://fb.watch/6E5x82NAsj/

Back to top button