भीषण अपघात : नायजेरियात प्रवासी बसची रेल्वेला धडक, ६ जणांचा मृत्यू; १२ जखमी
पुढारी ऑनलाईन : नायजेरियात एक प्रवसी बस रेल्वेला धडकली. या भीषण अपघातात ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात काल (गुरूवार) झाला. या अपघातात १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. देशाच्या आपत्कालीन प्रतिसाद संस्थेने ही माहिती दिली आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बस सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जात असताना सीटी ट्रेनला धडकली.
भीषण अपघातात सहा लोकांचा मृत्यू; १२ जण जखमी
नायजेरियातील बस आणि रेल्वेतील भीषण अपघातात आतापर्यंत ८४ लोकांना सुरक्षीत बाहेर काढून त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये रूग्णालयात भरती झाल्यानंतर मृत्यू झालेल्यांचाही समावेश आहे. या अपघातात सर्व जखमी हे बसमधील प्रवासी होते. मात्र रेल्वेतील कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर घेउन जाताना ही बस इकेजा क्षेत्रातील शहरांतर्गत रेल्वेला धडकली.
बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात
बस चालकाने ट्रॅफिक सिग्नल पाहिला नाही. त्यामुळे बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याच प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

