जेव्हा विवाहित माणसाच्या प्रेमात पडल्या होत्या श्रीदेवी

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडमध्ये 'चांदनी' नावाने प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी यांची आज २४ फेब्रुवारी रोजी तिसरा स्मृतिदिन आहे. त्यांनी २०१८ मध्ये अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेतला होता. घायाळ करणारं त्यांचं सौंदर्य प्रत्येकाला प्रेमात पाडणारं होतं. त्या स्वत: विवाहित असणाऱ्या बोनी कपूर यांच्या प्रेमात पडल्या. वेड लावणारं त्यांचा अभिनय, सौंदर्याने बोनी कपूर यांनाही प्रेम करायला भाग पाडलं. आपल्या चित्रपटात घ्यायचं म्हणून बोनी कपूर श्रीदेवी यांना शोधात त्यांच्या घरी पोहोचले होते. परंतु, त्यांची वेळ मिळाली नव्हती. मग, बोनी यांनी खूप प्रयत्न करून त्यांची वेळ घेतली होती…

श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर यांचे प्रेम सर्वश्रृत आहे. कुठलाही कार्यक्रम असो वा सोहळा बोनी कपूर यांची जोडी असायचीच. एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आपण चित्रपट निर्माते बनावे, अशी बोनी यांची तीव्र इच्‍छा होती. बोनी यांनी काही बिग बजेट चित्रपट आणले. ते ब्लॉकबस्टरही झाले. झगमगत्‍या दुनियेत वावरताना बोनी यांच्‍या आयुष्‍यात आली ती सुंदर तरुणी. जिचे नाव होते-श्रीदेवी. 

बोनी यांनी १९८० ते २०१२ या कालावधीत त्‍यांनी तब्‍बल ३२ चित्रपटांची निर्मिती केली. आपला धाकटा भाऊ अनिल कपूरला अभिनेता म्‍हणून त्‍यांनी चित्रपटसृष्‍टीत आणले.

'श्रीदेवीने आपल्या चित्रपटात काम करावं, बोनींची इच्छा' 

बोनी यांची 'मिस्टर इंडिया' चित्रपट आणण्‍याची मोठी योजना होती आणि त्‍यानुसार त्‍यांनी हा चित्रपट मोठ्‍या पडद्‍यावर आणला. 'मिस्टर इंडिया'साठी अभिनेत्रीचा शोध सुरू असताना त्‍यावेळची टॉपची अभिनेत्री म्‍हणून श्रीदेवी यांचे नाव होते. बोनी कपूर यांना या चित्रपटात श्रीदेवी यांनाच साईन करायचे होते. श्रीदेवी यांना या चित्रपटात आणणे इतके सोपे नव्‍हते. श्रीदेवी आधी विचार करूनच मगच चित्रपट साईन करायच्‍या. बोनी चेन्नईमध्‍ये श्रीदेवी यांना साईन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या घरी पोहोचले. त्‍यांना श्रीदेवी यांच्‍याकडून वेळ मिळाला नाही. बोनी सतत श्रीदेवी यांच्‍या घरी जायचे आणि श्रीदेवी यांना भेटायचा प्रयत्‍न करायचे. बोनी यांनी खुद्‍द निवेदन दिल्‍यानंतर ७ दिवसांनी त्‍यांना भेटण्‍यासाठी वेळ देण्‍यात आला. बोनी यांना वाटलं की, टाळाटाळ केली जात आहे.

त्‍यांनी चेन्नईमध्‍ये थांबण्‍याचा निर्णय घेतला. एक दिवस, बोनी श्रीदेवी यांना भेटलेच आणि आपल्‍या चित्रपटात काम करावे, अशी विनंती केली. अखेर त्‍यांच्‍या विनंतीला मान देऊन श्रीदेवी चित्रपटात काम करायला तयार झाल्‍या. नंतर 'मिस्टर इंडिया' चित्रपट आला आणि चित्रपटाने १९८७ मध्‍ये मोठे यश मिळवले.

त्‍यानंतर बोनी यांनी आपला आणखी एक महत्वाकांक्षी चित्रपट 'रूप की रानी चोरों का राजा' श्रीदेवी यांना मुख्‍य भूमिकेत घेऊन बनवला. हा चित्रपट अयशस्‍वी ठरला. श्रीदेवी सहजतेने कुणावर विश्‍वास करायच्‍या नाहीत. परंतु, बोनी यांच्‍यावर त्‍यांचा विश्वास बसला. बोनी हे त्‍यांचा भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी स्‍टारर 'जुदाई' चित्रपट बनवत होते. त्‍याचदरम्‍यान, श्रीदेवी यांची आई राजेश्वरी यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना उपचाराकरिता अमेरिकेला घेऊन गेले. त्‍यावेळी श्रीदेवी या बोनी कपूर यांना सोबत घेऊन गेल्‍या. श्रीदेवी यांच्‍या आईच्‍या उपचारावेळी बोनी कपूर यांनी त्‍यांना पाठिंबा दिला. परंतु, श्रीदेवी यांच्‍या आईचे निधन झाले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍या आईवर चुकीच्‍या पध्‍दतीने उपचार झाल्‍याचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आणि संघर्ष करून मोबदला वसूल केला. 

आणि श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले बोनी 

श्रीदेवी यांनी अनुभवले की, बोनी नि:स्वार्थ भावनेने हे सर्व करत होते. बोनी विवाहित आहेत, हे माहिती असतानादेखील श्रीदेवींना बोनी यांच्‍याशी प्रेम झाले. 'जुदाई' या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी बोनी श्रीदेवीच्‍या प्रेमात पडले होते. पुढे बोनी यांनी श्रीदेवी यांच्‍याशी विवाह केला. त्‍यावेळी बोनी यांना आपल्‍या कुटुंबीयांकडून नाराजीचा सामनादेखील करावा लागला. बोनी यांचा दुसरा विवाह असल्‍याने त्‍या काळात हे प्रकरण खूप वादग्रस्‍त ठरले होते. मीडियापासूनची ही गोष्‍ट लपवून ठेवण्‍यात आली होती. श्रीदेवी यांनी जुदाईनंतर काही काळासाठी अभिनयापासून ब्रेक घेतला होता. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news