सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

सोलापूर; पुढारी ऑनलाईन : सोलापूर मड्डी वस्ती परिसरात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सायंकाळी ८ वाजता समाजकंटकांकडून दगडफेक झाल्याचे कळते. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते.

पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर घोंगडी बैठकीसासाठी आले होते. सकाळी सोलापूरात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टिका केली होती यातुनच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, जिल्ह्यातील भाजप कार्येकर्ते पडळकर यांना भेटायला येत असल्याने गर्दी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news