देशभरातील ऑक्सिजन उपलब्धतेसंबंधी पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठक!

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोना महारोगराईची तिसरी लाट येण्यापूर्वी द्रव्यरूपी वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) संबंधी सर्व व्यवस्था दुरूस्त करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिले.

वाचा :सप्टेंबरमध्ये लहान मुलांना 'कोरोना लस' मिळण्याची शक्यता

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीतून वैद्यकीय ऑक्सिजनची पुरवठा वाढवण्यासह त्याची उपलब्धतेसंबंधी आढावा घेण्यात आला. देशभरात १५०० हून अधिक पीएसए ऑक्सिजन संयत्र तयार करण्यात येत आहेत. यावर अधिक वेगाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधानांनी बैठकीत व्यक्त केले, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पीएम केअर्स निधीतून देण्यात आलेले पीएसए ऑक्सिजन संयंत्रांमुळे चार लाखांहून अधिक ऑक्सिजन बेड ला मदत मिळेल. ऑक्सिजन संयंत्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी त्यावर वेगाने काम करण्याचे निर्देश बैठकीतून पंतप्रधानांकडून देण्यात आले. कोरोना महारोगराईचा सामना करण्यासाठी राज्य सरकारसोबत मिळून काम करावे तसेच ऑक्सिजन संयंत्रांचे संचलन तसेच देखरेखी संबंधी रूग्णालयातील कर्मचारी मुबलक प्रमाणात प्रशिक्षत असावेत हे ​सुनिश्चित करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ऑक्सिजन संयंत्रांच्या फास्ट-ट्रॅकिंग संबंधी राज्य सरकार तसेच अधिकाऱ्यांसोबत नियमित संपर्कात असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांना देण्यात आली.

वाचा :पंतप्रधानांनी नव्या मंत्र्यांना दिल्या 'या' सुचना; जाणून घ्या १० महत्वाच्या गोष्टी

प्रत्येक जिल्ह्यात प्रशि​क्षित कर्मचारी असावेत याकडे प्रकर्षाने लक्ष देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. सरकारला स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर ऑक्सिजन संयंत्रांच्या कार्यावर लक्ष ठेवण्याकरिता आयटीओ सारखे प्रगत तंत्रज्ञान तैनात करण्यावर लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशातील 8 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण मॉड्यूलची माहिती अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांना देण्यात आली. ऑक्सिजन संयंत्रांचे कार्य तसेच त्यांची देखभाल करण्यासाठी आयटीओ चा उपयोग करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प तयार केला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

मे-जून महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ नोंदवण्यात आल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून आले होते. ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासह त्यांचा अखंडित पुरवठा व्हावा याकरिता सरकार प्रयत्नरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने गुरूवारी २३ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

वाचा :कोरोना : देशात ४३ हजार नवे रुग्ण, ९११ मृत्यू

वाचा :कृषी पायाभूत निधी अंतर्गत सुधारणांना केंद्राची मंजूरी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news