आई म्हणायचं की, हैवान! प्रेमात अडथळा ठरणाऱ्या २६ वर्षीय मुलाची आईकडून हत्या

गुरुदासपूर (पंजाब) ः पुढारी ऑनलाईन

प्रेमासाठी लोक वाट्टेल त्या थराला जाण्याच्या तयारीत असतात. मग, पुरूष असो की, महिला. दोघेही आपलं प्रेम मिळविण्यासाठी रक्ताच्या नात्यांनाही विसरुन जातात. असंच एक प्रेम प्रकरण समोर आलं आहे. त्यामध्ये आपलं प्रेम आबाधित राहावं म्हणून आईने आपल्या २६ वर्षांच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केला. इतकंच नाही तर, मुलाचा मृतदेह गटारीत फेकून दिला. 

वाचा ः टीसीचा कोट घालून लुटणाऱ्याचा प्रवाशामुळे पर्दाफाश

सविस्तर वृत्त असं की, पंजाबमधील गुरुदासपूरमधील झंडो गुजरू गावातील एका गटारीत एक मुलाचा कुजलेल्या अवस्थेतीत मृतदेह स्थानिक लोकांच्या नजरेच पडला. पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्याचं पोस्टमार्टेम करून त्या मुलाची ओळख पटली. रणदीप सिंग असं या २६ वर्षीय मुलाचं नाव होतं. पोलिसांनी थेट मुलाच्या आईलाच ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. 

वाचा ः बोंबला! नवरा मुलाकडील लोकांना लुटत एकाच मुलीने केली १३ लग्नं; १४ व्या लग्नात अख्खी टोळीच पोलिसांच्या जाळ्यात

या चौकशीत आईच्या बोलण्यात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी आईच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. दोघांचीही पोलिसी खाक्या दाखवत चौकशी सुरू केली आणि धक्कादायक कृत्य पोलिसांसमोर आलं. आईचं नाव रुपिंदरजीत कौर आणि प्रियकराचं नाव सुखविंदर सिंग, असा जोडगोळीचं नाव आहे. अनेक दिवसांपासून दोघांचे अनैतिक संबंध होते. ती बाब मुलाला म्हणजेच रणदीप सिंगला कळली होती. तो तिच्या आईला या प्रेम प्रकरणापासून परावृत्त करत होता. दोघांच्यात वाद होत होते.  खरंतर तो दोघांच्या प्रेमात अडचण ठरला होता. 

वाचा ः पैलवान सुशिल कुमारने अशी केली सागर धनखडची हत्या अन् असा देत होता पोलिसांना चकवा

शेवटी वैतागून आईनेच मुलाची हत्या करण्याचा प्लॅन केला. प्रियकर सुखविंदर सिंग आणि त्याचा मित्र गुरुजित सिंग या दोघांच्या मदतीने आईनं स्वतःच्या मुलाचा खून केला. त्याच्या मृतदेह गटारामध्ये फेकून दिला आणि कुजलेल्या अवस्थेत तो मृतदेह स्थानिक लोकांच्या नजरेस पडला. पोलिसांना संबंधितांना दोघांना अटक केली असून चौकशी सुरू आहे. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news