अरे बाप रे! एकाच मुलीनं केली १३ लग्नं; नवरा मुलाकडील लोकांना लाखोंचा गंडा

नंदुरबार ः पुढारी ऑनलाईन

लग्न म्हंटलं की, एकमेकांवरचा विश्वास असतो. दोन कुटुंबं एकत्र येतात आणि नवी नाती निर्माण होतात. पण, लग्न म्हणजे फसवणुकीचा धंदा आणि मुलाकडील लोकांना निव्वळ लुटणे, असं समजत एका मुलीने आणि तिचा साथीदारांनी तब्बल १३ मुलांशी लग्नं केली. लाखो रुपये लुटले. मात्र, १४ व्या लग्नात मात्र, पोलिसांच्या जाळ्यात ही टोळी सापडली. 

सविस्तर बातमी अशी की, सोनू उर्फ पूजा शिंदे असं या मूळ तरुणीचं नाव आहे. नंदुरबार जिल्ह्यातीस शहादा तालुक्यातील मंदाणे गावातील एका तरुणासोबत तिचं लग्न झालं होतं. हे लग्न एका दलालाच्या माध्यमातून झाल्यामुळे नवऱ्या मुलाकडून १ लाख ३० हजार इतकी रक्कम सोनूच्या घरातील मंडळींना दिलेली होती. ५ मे रोजी लग्न झालं आणि १५ मे रोजी सोनू घरातून पहाटे रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली. म्हणजे केवळ १० दिवसांमध्ये ही मुलगी फरार झाली होती. 

वाचा ः संभाजीराजेंनी फुंकले रणशिंग; मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा करणार 

यासंदर्भात नवरा मुलगा भूषण सैदाणे यांने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी भूषणला त्याच्या नातेवाईकांकडून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, तुझ्या बायकोसारखी दिसणाऱ्या मुलीचं लग्न बेटावदमधील कपिलेश्वर मंदिरात होणार आहे, असं सांगितलं. भूषणने ही माहिती पोलिसांनी दिली. 

वाचा ः उत्तर प्रदेश निवडणुकीची काळजी! भाजप-आरएसएसच्या बैठकीला पीएम मोदींची हजेरी

पोलिसांनी बेटावद येथे जाऊन चौकशी केली असता असं कळलं की, नुकतंच लग्न झालेलं आहे. लग्नातील मंडळी स्नेहभोजन घेत आहेत. पोलिसांनी लग्नाच्या ठिकाणी जाऊन सोनू उर्फ पूजा शिंदे, तिची आई वंदना राजू शिंदे, रविंद्र गवबा गोपाळ, योगेश संजय साठे, विक्की राजेश कांबळे, या पाच जणांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान माहिकी कळली की, बेटावद येथूनही सोनू आणि तिच्या सहकाऱ्यांनी ५० हजार घेतल्याचे समोर आले. इतकंच नाही, तर या टोळीने तब्बल १३ लग्न करून नवऱ्या मुलाकडील लोकांना गंडा घातल्याचे कबूल केले. या टोळीतील २ दलाला फरार असून पोलिस त्यांचा तपास करत आहेत. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news