राहुल गांधींनी ट्विटरवर अनेक नेत्यांना का केले अनफॉलो?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन ; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चर्चेत आले आहेत. मागच्या काही दिवसांत राहुल गांधी यांनी नेते, पत्रकार आणि याचबरोबर मुख्य नेत्यांना अनफॉलो केले आहे. राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट रिफ्रेश  करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे काही अनफॉलो झाले असतील पण यानंतर त्यांना पुन्हा फॉलो करण्यात येणार असल्याचे काँग्रेस पक्षाकडून  सांगण्यात आले. 

अधिक वाचा : सुशीलकुमारच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ

राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटवर ज्यांना अनफॉलो केले आहे. यामध्ये त्यांच्याच कार्यालयातील काही सहकारी आणि कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दरम्यान पार्टीतील काही नेत्यांचीही समावेश आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर अनफॉलो केल्यामुळे पक्षातील काही नेत्यांनी यावर सवाल उपस्थित केला आहे. याचबरोबर पक्षातील काही नेत्यांचे मृत्यू होऊनही राहुल गांधी त्यांना फॉलो करत आहेत. यामध्ये तरुण गोगोई, अहमद पटेल, राजीव सातव यांच्यासह अन्य नेते आहेत.

अधिक वाचा : पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण पुढील दोन वर्षात २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्धार

राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटवर फॉलो करणार्‍यांची संख्या सतत बदलत आहे. मंगळवारी सकाळी राहुल गांधी २८१ जणांना फॉलो करत होते. यानंतर संध्याकाळी हीच संख्या आणखी कमी होऊन २१९ वर आली. यामुळे राहुल गांधी ट्विटरवर सक्रिय असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, आज राहुल गांधीनी मोदी सरकारवर टीका करत "अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार" असं ट्वीट केले आहे. 

अधिक वाचा : देशातील दुसऱ्या लसीसाठी केंद्राचा करार; ३० कोटी डोसचे बुकिंग

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news