मुंबई : पुढारी ऑनलाईन
देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. कोरोना रुग्णांची संख्या आता ४१ लाखांवर पोहचली आहे. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्यांना कोरोनाने गाठले आहे. अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्याने इंस्टाग्रामवरुन दिली. माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सगळ्यांना हे सांगणे माझे काम आहे. मी ठिक आहे. आणि माझ्यात कोणतेच लक्षणे नाहीत.असे त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून म्हटले आहे.
डॉक्टर आणि अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला घरी आयसोलेट केले आहे. आता मी होमक्वारंटाईन असेल. तुमच्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. येणाऱ्या दिवसात मी माझ्या आरोग्याबद्दल तुम्हाला अपडेट देत राहीन. ही एक विलक्षण आणि अभूतपूर्व वेळ आहे. मला खात्री आहे की आपण सगळी यातून बाहेर पडणार आहे. अर्जून कपूरच्या या पोस्टवर लोक बरीच कमेंट करत आहेत .
देशात गेल्या एका दिवसात कोरोना संसर्गासंबंधी दोन उच्चांकी आकड्यांची नोंद घेण्यात आली आहे. देशात कोरोना संसर्ग सुरु झाला तेव्हापासून पहिल्यांदाच उच्चांकी ९० हजारांहून अधिक कोरोनारुग्णांची भर पडली आहे. तर, दुसरीकडे उच्चांकी ७३ हजारांहून अधिक कोरोनामुक्त रुग्णांना एकाच दिवसात डिस्चार्च देण्यात आला आहे. असे असले तरी कोरोनारुग्णांच्या संख्येचा उद्रेक चिंतेत भर टाकणारा आहे.
वाचा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी
वाचा : केरळ सरकारला आव्हान देणारे केशवानंद स्वामी यांचे निधन
वाचा : रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारत कोरोनाबाधित रूग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न