‘या’ पोलिस अधिकाऱ्याचं नाव जरी ऐकलं, तरी ‘डॅडी’ला घाम फुटायचा!

पुढारी ऑनलाईन डेस्क 

२००४ ची निवडणूक दगळी चाळीतला डाॅन अरुण गवळी उर्फ डॅडी निवडणुकीला उभा राहिलेला. मात्र, मतदानादिवशी त्याला बाहेर पडण्याची भीती होती. कारण, त्याचा परिसरात इन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर उभे होते. त्यावेळी गवळी म्हणाला होता की, "वो येडा अधिकारी मेरा खून कर देगा", त्याच्या या वाक्यावरूनच आपल्याला समजेच की, शहीद पोलिस अधिकारी विजय साळसकरचा नावाची भीती गवळीला किती होती. 

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर यांच्या नावाने मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील प्रत्येकाला धडकी भरायची. मुंबईच्या स्पेशालिस्ट स्क्वाडमध्ये साळसकर होते. मुंबईचे गुन्हेगारी विश्व साफ करण्याचे काम साळसकरांनी अनेक जणांचा खात्मा करूनच पूर्ण केले होते. त्यांच्या नावावर तब्बल ६१ जणांचा इन्काऊंटर केल्याचा रेकाॅर्ड होता. सुरुवातील बाबू रेशीम, रामा नाईक आणि अरुण गवळी यांच्या बीआरए गॅंगने मुंबईत धुमाकूळ घातला होता. 

बाबू रेशीम आणि रामा नाईकची त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी हत्या केली होती. आता राहिला अरुण गवळी. एक तर प्रतिस्पर्ध्यांकडून तो मारला जाणार होता किंवा साळसकरांच्या हातून. यात अरुण गवळीने एका महिला पत्रकाराला मारहाण केली होती. जिथे गवळीच्या दगडी चाळीत पोलिसांनीही प्रवेश करणं सहजशक्य नव्हतं तिथे ही मारहाणीची केस समोर आली. मग, हीच ती वेळ होती. गवळीला फरपटत आणण्याची. 

अधिक वाचण्यासाठी : GANG'S of दगडी चाळ! कशी तयार झाली अरुण गवळी उर्फ डॅडीची गॅंग? 

विजय साळसकर हे निर्भीड आणि धाडसी अधिकारी होते. त्यांनी ४ पोलिसांना आपल्या सोबत घेतले आणि दगडी चाळीत घुसले. सरळ अरुण गवळीची काॅलर पकडली आणि फरपटत पोलिस ठाण्यात आणले. त्याला धू…धू… धूतला. या घटनेना मुंबईचं अंडरवर्ल्ड चांगलंच हादरलं. यापूर्वी कुणाची हिंम्मत नव्हती दगडी चाळीत घुसण्याची, पण विजय साळसकरांनी अरुण गवळीला चांगलाच वठणीवर आणला होता. 

विजय साळसकरांनी १९९७ साली फक्त १५ दिवसांमध्ये अरुण गवळीच्या ३ शार्प शूटर्सचा इन्काऊंटर केला. त्यात गणेश भोसले, सदा पावले आणि विजय तांडेल यांचा समावेश होता. त्यामुळे २००४ च्या निवडणुकीच्या मतदानावेळी बाहेर पडायला अरुण गवळी भीती वाटत होती.  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news