पेट्रोल दरात 27 पैशांची तर डीझेल दरात 29 पैशांची वाढ

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा ; जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वधारल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून मंगळवारी इंधन दरात वाढ करण्यात आली. तेल कंपन्यानी पेट्रोल दरात 27 पैशांची तर डीझेल दरात 29 पैशांची वाढ केली आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रती लीटरचे दर 92.85 रुपयांवर तर डीझेलचे दर 83.51 रुपयांवर गेले आहेत. 

अधिक वाचा : भाजप आमदारालाच 'देशद्रोहा'चा गुन्हा दाखल होण्याची भीती

प. बंगालसह पाच ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यापासून इंधन दरात वाढ सुरू आहे. 2 मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते, तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोल दरात अडीच रुपयांची वाढ झाली आहे. 

अधिक वाचा :कोरोना काळात सुपरस्टार रजनीकांतची सीएम फंडला भरघोस मदत

राजस्थानमधील श्रीगंगानगर, मध्य प्रदेशातील भोपाळ, अनूपपुर सहित देशाच्या विविध शहरातील पेट्रोलचे दर आता शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. आर्थिक राजधानी मुंबईतील पेट्रोलचे दर 99.14 रुपयांवर तर डीझेलचे दर 90.71 रुपयावर गेले आहेत. 

अधिक वाचा :  रत्नागिरी जिल्ह्याला ताउक्ते चक्रीवादळाने झोडपले; शासकीय रुग्णालयातही पाणी तुंबले

तामिळनाडूतील चेन्नई येथे पेट्रोल, डीझेलचे दर क्रमशः 94.54 आणि 88.34 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे प. बंगालमधील कोलकाता येथे हेच दर क्रमशः 92.92 आणि 86.35 रुपयांवर गेले आहेत. जागतिक बाजारात क्रूड तेलाचे दर 70 डॉलर्स प्रती बॅरलवर गेल्याने तेलाच्या दरात वाढ सुरू झाली आहे. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news