सप्टेंबरमध्ये लहान मुलांना लस मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : भारतात १२ ते १८ वर्षांच्या मुलांना 'जायडस कॅडिला' नावाची करोनावरील लस ही सप्टेंबरमध्ये मिळू शकते. लसीकरणावर गठीत करण्यात आलेल्या समितीतील तज्ज्ञ प्रमुखांनी हे संकेत दिलेले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवर होणार आहे, अशी शंका व्यक्ती केली जात असताना मुलांसाठीच्या लसींचे संकेत मिळालेले आहेत. 

जाइडस कॅडिला या कोरोनावरील लसीचे मुलांवर केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष सप्टेंबरच्या अगोदरच मिळण्याची आशा आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रूप ऑन वॅक्सीनचे प्रमुख डाॅ. एन. के. अरोरा यांनी ही माहिती दिली आहे. एका वृतीवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीत डाॅ. अरोरा म्हणाले की, "जाइडसच्या लसीला आतपकालीन वापरासाठी हिरवा सिग्नल काही आठवड्यांमध्ये मिळेल."

वाचा ः शिवसेना म्हणते, 'हा तर पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करण्याचा डाव'

भारतात मुलांसाठी भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस ही लवकरच उपलब्ध होऊ शकते. कोवॅक्सिनचे प्रयोगाचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि सप्टेंबरपर्यंत तो पूर्ण होण्याची आशा आहे. यातच ऑक्टोबर किंवा डिसेंबर दरम्यान, किंवा जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान २ वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते. मात्र, जाइडस कॅडिला या लसीचा डेटा त्याच्या अगोदर मिळण्याची शक्यता आहे. 

वाचा : पंतप्रधानांनी नव्या मंत्र्यांना दिल्या 'या' सुचना; जाणून घ्या १० महत्वाच्या गोष्टी

डाॅ. अरोरा म्हणाले की, "देशात शाळा सुरु करण्यापासून अन्य महत्वाच्या मुद्द्यांवरही गंभीरतेने चर्चा केली जात आहे. आशा आहे की, सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत लसीकरणाचे कामकाज सुरू करू शकू. पेडियाट्रिक असोशिएशनसहीत काही तज्ज्ञांनी सांगितले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवर होऊ शकतो, हा अंदाज चुकूही शकतो. आणि लहान मुलांची प्रतिकार शक्ती चांगली असल्याने मुलं सुरक्षितही राहतील. पण, सरकार कोणताही धोका स्वीकरण्याच्या मनस्थितीत नाही", अशी माहिती अरोरा यांनी दिली. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news