ट्रम्प यांची धमकी दोन दिवसात खरी ठरली; अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर ठार

न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन 

इराकची राजधानी बगदाद येथे गुरुवारी रात्री केलेल्या हल्ल्यात अमेरिकेने इराणच्या Iranian Revolutionary Guards च्या उच्च प्रशिक्षित कडस फोर्सचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी यांना ठार मारले. सुलेमानी यांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हवाई हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहंदिसही ठार झाल्याची माहिती आहे.

अधिक वाचा : थेट धमकी देत ट्रम्प यांची नवीन वर्षाची सुरुवात!

इराणच्या सरकारी टीव्हीने सुलेमानी यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. सुलेमानी यांना पश्चिमी आशियात इराणी उपक्रम राबविण्यासाठी मुख्य रणनीतिकार मानले जात होते. सुलेमानी यांच्यावर सीरियामध्ये आपली मुळे स्थापन करण्याचा आणि इस्रायलमध्ये रॉकेट हल्ल्याचा आरोप आहे. अमेरिका बराच काळ सुलेमानी यांच्या शोधात होती. पेंटागॉननेही सुलेमानी यांच्या मृत्यूला दिला आहे. अमेरिकन मीडियानुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेन सैन्याने इराणचे वरिष्ठ कमांडर सुलेमानी यांना ठार मारले आहे. 

अधिक वाचा : दहशतवादी हल्ल्याबाबत ट्रम्प यांनी रशियाला केले सतर्क 

दरम्यान, सुलेमानी यांना मारण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेचा ध्वज ट्विट केला. ट्रम्प यांनी याद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. या ट्विटमध्ये अमेरिकेचा ध्वज मजकूराविना दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव वाढीस लागला आहे. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध लावले आहेत.

अधिक वाचा : कुठं घडलं? तब्बल ५ लाख मुस्लिम मुलं बोर्डिंगमध्ये; आई वडिलांची रवानगी डिटेंशन सेंटरमध्ये!

अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव नक्की वाढणार आहे. इराणच्या मिलिशियाने बगदादमधील अमेरिकी दूतावासावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने हा हल्ला केला आहे. परदेशी कारवाईसाठी जबाबदार असणार्‍या इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सच्या तुकडी असलेल्या कडस फोर्सने सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद आणि त्यांचे लेबनानी सहयोगी हिज्बुल्लाहला कच्च्या तेलाच्या माध्यमातून पाठिंबा दिला होता. असा आरोप अलीकडेच अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने केला होता. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news