#America इराणच्या दुसऱ्या सर्वोच्च शक्तीशाली मेजर जनरलना अमेरिकेने का मारले?

इराकची राजधानी बगदादमध्ये विमानतळाजवळ अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणी मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले. या रॉकेट हल्ल्यात किमान 7 जण ठार झाले आहेत. कासिम व्यतिरिक्त, इराकमधील इराण समर्थक सशस्त्र दलाचे उप कमांडर अबू महदी अल-मुहांदिसही मारले गेले.

अधिक वाचा : ट्रम्प यांची धमकी दोन दिवसात खरी ठरली; अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर ठार

इराण रेव्होल्यूशनरी गार्ड्सची परदेशी शाखा असलेल्या कुड्स फोर्सची जबाबदारी सांभाळणारे कासिम यांना अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू मानले जात असे. यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो. विशेषत: इराकमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. इस्लामिक स्टेटच्या दहशतीतून बगदादला वाचवण्यासाठी, त्यांच्या नेतृत्वात इराण समर्थक सैन्याची स्थापना केली गेली. त्यांना पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स म्हणतात. १९८० च्या दशकात इराण आणि इराक दरम्यान झालेल्या रक्तरंजित युद्धात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. या युद्धामध्ये अमेरिकेने इराकी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचे समर्थन केले.

अधिक वाचा : कोणत्या मुद्यावरून इम्रान खान यांची पाकिस्तानमध्येच बोलती बंद?

इराक आणि सीरियामध्ये त्यांनी इस्लामिक स्टेटसारख्या अतिरेकी दहशतवादी संघटनेशी दोन हात करण्यासाठी कुर्दिश सैनिक आणि शिया मिलिशिया एकत्र करण्याचे काम केले. इराकमध्ये, इराणच्या पाठिंब्याने तयार केलेली लोकप्रिय मोबिलायझेशन फोर्स कासीम यांनी तयार केली. इराणसाठी कासिम सुलेमानी यांची अमेरिकेकडून झालेली हत्या हा मोठा धक्का आहे, जो इराक आणि सिरियातील अमेरिकेच्या हस्तक्षेपाविरूद्ध आहे. सुलेमानी यांनी पॅलेस्टाईन, हमासमध्ये कार्यरत असलेल्या हिज्बुल्लाह संघटनेला पाठिंबा दर्शविला होता, असे मानले जाते. सीरियामधील बशर अल-असाद सरकारलाही कासिम सुलेमानी यांचा पाठिंबा होता.

अधिक वाचा : थेट धमकी देत ट्रम्प यांची नवीन वर्षाची सुरुवात!

इराणच्या सुदूर-पूर्वेकडील गरीब कुटुंबातील सुलेमानी इस्लामिक क्रांतिकारक गार्डमध्ये रुजू झाले. देशाच्या सुरक्षा आणि विचारसरणीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी हा रक्षक तयार करण्यात आला होता. १९८० आणि १९८८ च्या शेजारच्या इराकबरोबर झालेल्या युद्धानंतर गार्डकडे राजकीय आणि आर्थिक शक्ती आली. इराकमधील रक्तरंजित संघर्षामुळे सुलेमानी यांना पुढे येण्यास मोठी मदत झाली. 

आपल्या वयाच्या 20 व्या वर्षी, सुलेमानी यांनी शत्रूंविरूद्ध अनेक मोहिमा चालवल्या. ते इराणच्या शत्रूंना चिरडण्यासाठी ओळखले जातात. १९९० च्या उत्तरार्धात त्यांना कुड्स गार्डचे प्रमुखपदी नेमण्यात आले.  काही दिवसांपूर्वी बगदादमधील दूतावासावर झालेल्या हल्ल्यात इराणचा हात उघड होताच कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने हल्ला करून ठार केले आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर म्हणाले की, आता खेळ बदलला आहे. ते म्हणाले की, इराणला पाठिंबा देणार्‍या सशस्त्र दलांना अमेरिकेच्या सैन्य दलाकडून उत्तर दिले जाईल.

अधिक वाचा : कुठं घडलं? तब्बल ५ लाख मुस्लिम मुलं बोर्डिंगमध्ये; आई वडिलांची रवानगी डिटेंशन सेंटरमध्ये!

कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचीही हाताच्या अंगठ्याने खात्री झाली आहे. ते नेहमी एका बोटात लाल अंगठी घालत असे. इराकी पत्रकार स्टीव्हन नबिल यांनी ट्विटमध्ये सुलेमानी यांचा जुना फोटो आणि मृत्यू नंतरचा फोटो शेअर केला आहे. दोन्ही चित्रांमध्ये त्यांच्या बोटावर लाल रंगाची अंगठी दिसते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news