अमेरिकेचा इराकमध्ये पुन्हा एअर स्ट्राईक; ६ ठार

बगदाद : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेने इराकमध्ये शनिवारी सकाळी पुन्हा एअर स्ट्राईक केला असून या हल्ल्यात ६ जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. हा सलग दुसरा एअर स्ट्राईक असून शुक्रवारी पहाटे केलेल्या पहिल्या एअर स्ट्राईकमध्ये अमेरिकेने इराणच्या Iranian Revolutionary Guards च्या उच्च प्रशिक्षित कुड्स फोर्सचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी यांना ठार मारले होते. 

अधिक वाचा : आखातावर युद्धाचे ढग

शनिवारी सकाळी बगदादजवळील ताजी रोज जवळ अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी हवाई हल्ला केला. इराकमधील सरकारी अधिका-यांनी सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्यात दोन चारचाकी वाहनांना लक्ष्य करण्यात आले. या वाहनात इराण समर्थक व इराकमधील संघटना 'हश्द-अल-शाबी'चे काही लोक होते. या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांची ओळख पटलेली नाही. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणाजवळ ब्रिटन आणि इटलीच्या सैन्याचे तळही आहेत. 

अधिक वाचा : #Iran इराणची अमेरिकेला बदल्याची धमकी

हश्द-अल-शाबीला पॉपुलर मोबिलायजेशन फोर्स (PMF) नावाही ओळखले जाते. या संघटनेने हल्ला झालेल्या ताफ्यात कोणताही वरीष्ठ कमांडर ठार झाला नसलाचे सांगीतले आहे. मात्र या हल्ल्यात काही डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती संघटनेने दिली आहे. 

अधिक वाचा : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर ठार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news