

पुढारी ऑनलाइन डेस्क : Neeraj Chopra : जागतिक अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकत इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्रा याने कार्यक्रमानंतर आपल्या पाकिस्तानी प्रतिस्पर्धी अर्शद नदीम याची भेट घेतली. आपल्या मैदानावरील प्रतिस्पर्ध्याला बाजूला ठेवून नीरजने आपल्या कट्टर पाकिस्तानी प्रतिस्पर्धी अर्शद याला आलिंगन दिले. याचे चित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत नीरजने अर्शद सोबतच्या भेटीचे आणि संभाषणाविषयी माहिती दिली.
नीरज म्हणाला, मी कार्यक्रमानंतर अर्शदला भेटलो. आम्हाला आनंद झाला की आमचे दोन्ही देश क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती करत आहेत. आम्हा दोघांनाही अतिशय शक्तिशाली अशा आमच्या युरोपियन प्रतिस्पर्धींवर विजय मिळवला, याचा आम्हाला आनंद आहे. तर आमच्या भारत-पाकिस्तान या आमच्या दोन्ही राष्ट्रांत प्रतिस्पर्धा नेहमीच असणार आहे. लवकरच आशियाई क्रीडा स्पर्धा येत आहे. यामध्ये आम्ही पुन्हा हांगझोऊ येथे भेटू, तेव्हा विजयामुळे आमच्या दोघांकडून आमच्या देशातील बांधवांच्या अपेक्षा उंचावल्या जातील.
बुडापेस्ट येथील अॅथलेटिक्स स्पर्धेत आपल्या कट्टर पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्यावर मात करत गोल्डन बॉय नीरज चोप्राने आनंद साजरा केला. मात्र, या सामन्यात अर्शदने कडवी टक्कर दिली होती. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताच्या नीरजने अखेर 0.35 मीटरच्या फरकाने पराभूत करण्यास यश मिळवले. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 88.17 मीटर फेक नोंदवून विजयी गर्जना केली. चुरशीच्या लढतीत आपल्या पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याचा आनंद नीरजच्या चेहऱ्यावर उमटला होता.
जागतिक अॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केल्यानंतर 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज पुन्हा एकदा भारताचे नेतृत्व करणार आहे. ही आशियाई क्रीडा स्पर्धा नीरजची या वर्षातील शेवटची मोठी स्पर्धा असेल. या स्पर्धेत नीरज पुन्हा एकदा आपल्या कट्टर पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याशी स्पर्धा करण्यासाठी उत्सुक आहे, असे नीरज याने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
हे ही वाचा :