पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहार लोकसेवा आयोग (BPSC) परीक्षेतील कथित पेपर फुटीवरून सुरू असलेल्या वादावर पूर्वश्रमीचे राजकीय रणनीतीकार आणि जन सूरज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आजपासून (२ जानेवारी) पाटणाच्या गांधी मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांनी बिहार सरकार समोर पाच प्रमुख मागण्या केल्या आहे.
रविवारी पाटणा येथे BPSC परीक्षार्थींनी केलेल्या निदर्शनेनंतर प्रशांत किशोर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर उमेदवारांना भडकावणे, त्यांना रस्त्यावर आणणे आणि विस्कळीत करणे यासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता त्यांनी पाच मागण्या करत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
बिहार लोकसेवा आयोग (BPSC) परीक्षेतील कथित पेपर फुटीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. तसेच आयोगाने फेरपरीक्षा घ्यावी.
२०१५ मध्ये दिलेल्या आश्वासनानुसार १८ ते ३५ वयोगटातील सर्व बेरोजगारांना भत्ता देण्यात यावा.
बिहार लोकसेवा आयोग (BPSC) परीक्षेतील झालेल्या घोटाळ्यातील आरोपींवर केलेल्या कारवाईची श्वेत पत्रीका प्रसिद्ध करावी.
बिहारमध्ये कुशासन आणणार्या प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी.
बिहारमधील सरकारी नोकरीत दोन तृतीयांश बिहार तरुणांना संधी मिळण्यासाठी डोमोसाईल प्रमाणपत्र नीती लागू करावी.