

परमरुद्र हे भगवान शंकराचे दुसरे रूप मानले जाते. केेंद्र सरकारने कॉम्प्युटरला ‘परमरुद्र’ असे नाव दिले आहे. या सुपर कॉम्प्युटर्समुळे अगणिक माहिती आणि डेटाबाबत त्वरित उकल होण्यास मदत होणार आहे. जगातील टॉप 500 सुपर कॉम्प्युटरच्या यादीत चीन, जपान आणि अमेरिका आघाडीवर आहेत. या यादीत भारतीय सुपर कॉम्प्युटरला स्थान प्राप्त झाले आहे, हे विशेष...
सुपर कॉम्प्युटर्स म्हणजे काय, याची सर्वसामान्यांना जुजबी माहिती असू शकते. सामान्य संगणक जी बाब 500 वर्षांत करू शकत नाही, ती बाब सुपर कॉम्प्युटरद्वारे काही सेकंदांत होते.
पृथ्वीला सूर्याभोवती 10 लाख परिभ्रमणे करण्यासारख्या जटिल गणना परमरुद्रद्वारे काही तासांत केली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 130 कोटींचे सुपर कॉम्प्युटर्स देशाला लवकरच समर्पित करणार आहेत.
पुणे, दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणी हे महाकाय संगणक तैनात ठेवले जातील. पुण्यातील मीटर रेडिओ टेलिस्कोप, रेडिओ बर्स्टसह अन्य खगोलीय संशोधनामध्ये या सुपर कॉम्प्युुटर्सचा वापर करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये इंटरयुनिव्हर्सिटी एक्सलेटर सेंटर, पदार्थ विज्ञान, अणू,भौतिक शास्त्रातील संशोधनामध्ये याचा वापर केला जात आहे.
राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटर मोहिमेअंतर्गत परमरुद्रची निर्मिती करण्यात आली आहे. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम 8000 हा होता. 1991 साली याची निर्मिती करण्यात आली होती. याचे आरेखन आणि निर्मिती पुण्यात झाली होती.
जगातील टॉप 500 सुपर कॉम्प्युटरमध्ये पाककडे हलक्या दर्जाचे दोन सुपर कॉम्प्युटर्स असल्याने या यादीत पाकिस्तानचे नाव नाही. जगातील पाचशे सुपर कॉम्प्युटरमध्ये भारतातील अद्ययावत 11 सुपर कॉम्प्युटर्सचा समावेश आहे.
भारताचे सुपर कॉम्प्युटर्स अद्ययावत आहेत. परम अनंत, परम शक्ती, परम शिवाय, बरम ब्रह्म या सुपर कॉम्प्युटर्सचा जगभर नावलौकिक आहे. परमरुद्र याच सुपर कॉम्प्युटर्सची आवृत्ती आहे.