झिका विषाणू : कर्नाटकात एकाचा संशयास्‍पद मृत्‍यू, जाणून घ्‍या खबरदारीचे उपाय

केंद्र सरकारची राज्यांना सतर्क राहण्याची सूचना
Zika virus
देशातील अनेक राज्‍यांमध्‍ये झिका विषाणूची लागण झाल्‍याचे प्रकरणी नोंदवली जात आहेत. Representative image
Published on
Updated on

काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील एकाचा झिका विषाणूची लागण झाल्‍याने मृत्‍यू झाला आहे. संबंधित रुग्णाचा मृत्यू थेट विषाणूमुळे झाला आहे की नाही, हे डॉक्टरांना अद्याप तपासता आलेले नाहीत. देशातील अनेक राज्‍यांमध्‍ये झिका विषाणूची लागण झाल्‍याचे प्रकरणी नोंदवली जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकताच राज्यांसाठी अलर्टही जारी केला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्‍यासाठी कोणती काळजी घ्‍यावी याबाबत काही सूचना केल्‍या आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्‍यासाठी कोणती काळजी घ्‍यावी याबाबत काही सूचना केल्‍या आहेत. याविषयी जाणून घेवूया...

कर्नाटकमधील रुग्णाला 18 जून रोजी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या रक्त आणि लघवीचे नमुने तज्ञांनी तपासले. यानंतर अंतिम अहवालासाठी ते बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) कडे पाठवले गेले. एनआयव्ही अहवालाने पुष्टी केली की 21 जून रोजी रुग्णाला झिका विषाणूची लागण झाली होती. झिकाची लागण झालेल्‍या रुग्‍णांनी घाबरून न जाता त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे. अन्‍यथा अनावश्यक विलंबामुळे गुंतागुंत होऊ शकते. रुग्‍णांनी स्वत: औषधोपचार करू नयेत. डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानेच सर्व उपाययोजना कराव्यात.

Zika virus
झिका बाधीत गरोदर महिलांची काळजी घ्या; केंद्राच्या राज्याला सक्त सूचना

काय करावे?

  • झिका विषाणूचा संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डास चावण्याचा धोका कमी करणे.

  • दीर्घकाळ साचलेल्‍या पाण्‍यात डासांची पैदास होते. त्‍यामुळे आपल्या सभोवतालची पाणी साचले आहे का, भांडी आणि बादल्‍यामुळे दीर्घकाळ पाणी ठेवले गेले आहे का, याची खात्री करावी.

  • गर्भवती महिलांनी विशेषतः संक्रमित भागात प्रवास टाळावा

  • झिकाची लागण झालेल्‍या रुग्‍णांनी घरातच राहावे, शक्य तितकी विश्रांती घ्यावी आणि भरपूर द्रव प्यावे.

Zika virus
Nashik Zika Virus | धक्कादायक | नाशिक महापालिकेने दडवला 'झिका' रुग्ण

कोणती खबरदारी घ्‍याल?

  • डासांचा प्रादुर्भाव अधिक असेल अशा ठिकाणी दारे आणि खिडक्या बंद असल्याची खात्री करा.

  • पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, विशेषत: घराबाहेर पडताना आणि खेळायला जाणाऱ्या मुलांसाठी डास प्रतिबंधकाचा वापर करा.

  • ताजे अन्न खाण्‍यास प्राधान्‍य द्‍या

  • घरातील जागा हवेशीर असल्याची खात्री करा.

  • हाताने आपल्या नाकाला आणि तोंडाला स्पर्श टाळा.

  • रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

  • नेहमी मूलभूत स्वच्छता राखा. शक्य तितक्या वारंवार आपले हात धुवा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news