Youth Congress president arrested: AI भारत मंडपममधील शर्टलेस आंदोलन भोवलं... युथ काँग्रेसच्या अध्यक्षाला अटक

Youth Congress president arrested
Youth Congress president arrestedpudhari photo
Published on
Updated on

Youth Congress president arrested: दिल्ली पोलिसांनी युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष (IYC) उदय भानू चीब यांना २० फेब्रुवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम इथं झालेल्या आंदोलनप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीब यांना सोमवारी चौकशीनंतर अधिकृतरित्या अटक करण्यात आली. त्यांच्या या अटकेनंतर आता AI ग्लोबल समीटमध्ये झालेल्या आंदोलन प्रकरणी अटक झालेल्यांची एकूण संख्या ८ झाली आहे.

सोमवारी जितेंद्र यादव, राजा गुजर आणि विमल अजय कुमार यांना अटक करण्यात आली होती. यादव हा ग्वाल्हेरचा राहणारा असून तो IYC राष्ट्रीय समन्वयक आहे. गुजर हा IYC ग्वाल्हेर जिल्हा अध्यक्ष आहे. तर कुमार हा भिंडचा पदाधिकारी आहे.

एआय इम्पॅक्ट एक्स्पोमध्ये हॉलमध्ये काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून आंदोलन केलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलनकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी अनिवार्य असलेली ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया त्यांनी क्युआर कोडच्या द्वारे पकेली होती. त्यांनी कॅज्युअल ड्रेस घातले होते. त्यांनी स्वेटर्स, जॅकेट आणि टीशर्ट घातले होते.

पोलिसांनी या तरूण कार्यकर्त्यांनी कार्यक्रमातील हॉलमध्ये शर्टलेस आंदोलन केलं. त्यांनी राजकीय हेतूनं प्रेरित घोषणा दिल्या आणि टीशर्ट घातले होते. त्यातील काही घोषणा या थेट पंतप्रधानांच्या विरोधात होत्या.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत हे तरूण आंदोलनादरम्यान आपल्या अंगावरील कपडे काढताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी आतील पंतप्रधान विरोधी मजकूर लिहिलेला शर्ट दाखवला. त्यानंतर त्यांना बाहेर काढताना त्यांनी घोषणाबाजी देखील केली. हा व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे. यात काही सुरक्षा कर्मचारी आणि उपस्थित लोकं युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हॉलमधून बाहेर घालवताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news