टिंग ॲप्सवर बनावट प्रोफाइल बनवून ७०० महिलांची फसवणूक प्रकरणी तरुणाला अटक

Online Scam | बंबल-स्नॅपचॅटवर खासगी फोटो मागवून व्हायरल करण्याची धमकी दिली
टिंग ॲप्सवर बनावट प्रोफाइल बनवून ७०० महिलांची फसवणूक प्रकरणी तरुणाला अटक
File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: डेटिंग ॲप्सवर ७०० महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी २३ वर्षीय तुषार सिंग बिश्त याला पूर्व दिल्लीतील शकरपूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. दिल्लीचा रहिवासी असलेल्या तुषारने बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) मध्ये पदवी प्राप्त केली आहे. गेल्या ३ वर्षांपासून तो नोएडा येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याने दिल्लीत ७०० महिलांकडून ऑनलाइन खंडणी घेतल्याची घटना समोर आली आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून महिलांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने ही खंडणी घेतली आहे.

ॲपद्वारे मिळवलेल्या व्हर्च्युअल आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरचा वापर करून, तुषारने डेटिंग ॲप्स बंबल आणि स्नॅपचॅट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट प्रोफाइल तयार केले. त्याने या सोशल मीडीयाच्या जगात स्वतःला युएस मॉडेल म्हणून ओळख दिली. त्याचे लक्ष्य प्रामुख्याने १८ ते ३० वयोगटातील तरुणी आणि महिला होत्या. त्यांच्याशी सदर तरुणाने या प्लॅटफॉर्मद्वारे या वयोगटातील महिलांशी आणि तरुणांशी मैत्री केली.

आरोपीने कशी फसवणूक केली?

एकदा त्यांचा विश्वास संपादन केल्यावर तुषार मैत्रीच्या नावाखाली त्यांचे फोन नंबर आणि खासगी फोटो किंवा व्हिडिओ मागवायचा. सुरुवातीला, त्याने हे कृत्य वैयक्तिक मनोरंजनासाठी केले. मात्र, कालांतराने त्याने महिलांना फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी घ्यायला सुरुवात केली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषारने या फोटो आणि व्हिडीओचा वापर करून महिलांना ब्लॅकमेल केलेजर एखाद्या पीडितेने त्याच्या पैशाच्या मागणीला नकार दिला, तर तो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची किंवा डार्क नेटवर विकण्याची धमकी द्यायचा.

प्रकार उघडकीस कसा आला?

पोलिसांच्या निष्कर्षांनुसार, तुषारने बंबलवर ५०० हून अधिक महिलांशी आणि स्नॅपचॅट आणि व्हॉट्सॲपवर २०० हून अधिक महिलांची फसवणूक केली. दिल्ली विद्यापीठाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनीने १३ डिसेंबर २०२४ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. २०२४ मध्ये जानेवारी महिन्यात तिने तुषारशी बंबलवर संपर्क साधला तेव्हा तिची परीक्षा सुरू झाली होती. त्याने स्वतःची ओळख यूएस-आधारित मॉडेल म्हणून सांगितली आणि मैत्री सुरू केली. त्यांच्या देवाणघेवाणी दरम्यान, पीडितेने त्याच्यासोबत वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. तिने प्रत्यक्ष भेटण्याची विनंती केली असता, तो सातत्याने तिला विविध सबबी सांगून टाळत होता. काही वेळातच, त्याने तिला तिचा एक खाजगी व्हिडिओ पाठवला आणि पैशाची मागणी केली. तिने न ऐकल्यास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि विकण्याची धमकी दिली. सुरुवातीला विद्यार्थिनीने आर्थिक चणचण भासवत अल्प रक्कम देऊन दबावाला बळी पडले. तथापि, तुषारच्या सततच्या मागण्यांमुळे तिला तिच्या कुटुंबावर विश्वास ठेवण्यास आणि औपचारिक तक्रार दाखल करण्यास भाग पाडले.

प्रकरणाचा तपास

पश्चिम दिल्लीच्या सायबर पोलिस स्टेशनने एसीपी अरविंद यादव यांच्या देखरेखीखाली एक टीम तयार केली. शकरपूर येथे छापा टाकून त्याला अटक करण्यात आली आहे. ही विशेष टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. कारवाईदरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याची माहिती असलेला एक मोबाइल फोन, त्याच्या गुन्हेगारी कारवायांशी जोडलेला एक आभासी आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबर आणि विविध बँकांचे १३ क्रेडिट कार्ड जप्त केले. पोलिसांनी दिल्ली आणि आसपासच्या भागातील महिलांसोबत ६० हून अधिक व्हॉट्सॲप चॅट रेकॉर्ड देखील मिळवले आहेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, तक्रारदाराशिवाय आणखी ४ महिलांकडूनही तुषारने अशाच प्रकारे पिळवणूक केली होती. तपासात तुषारशी जोडलेली दोन बँक खाती उघडकीस आली. एका खात्यात त्याच्या पीडितांनी केलेल्या पेमेंटच्या नोंदी होत्या, तर दुसऱ्या खात्याचा तपशील अद्याप तपासात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news