

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आज (दि. १२ जानेवारी) भोपाळमधील शौर्य स्मारकात जगातील सर्वात मोठी ३-डी रांगोळी देखील आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी युवा दिनानिमित्त राज्यव्यापी 'स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन' सुरू केले. राज्याच्या विकासात तरुणांच्या क्षमतेचा वापर करण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आलेल्या, या अभियानाचे नाव युवा प्रतीक स्वामी विवेकानंद यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने, स्वामी विवेकानंदांची जगातील सर्वात मोठी ३-डी रांगोळी बनवली आहे. युवा शक्ती मिशन केवळ तरुणांसाठीच खास नाही तर ते मध्य प्रदेशला अभिमानास्पद देखील बनवेल. आज मध्य प्रदेशच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम होणार आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त म्हणजेच १२ जानेवारी रोजी मुख्यमंत्री युवकांसाठी एक मिशन सुरू करतील. यासोबतच, भोपाळमधील शौर्य स्मारकात जगातील सर्वात मोठी ३-डी रांगोळी देखील आकर्षणाचे केंद्र असेल.
स्वामी विवेकानंदांची ही रांगोळी १८ हजार चौरस फूट जागेत बनवली आहे. त्याचा आकार २२५X८० इतका आहे. यासाठी ४ हजार किलो रंगांचा वापर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मोहन यादव हे देखील रांगोळीत दिसतील. ही रांगोळी बनवण्यामागील सीएम यादव यांचा उद्देश तरुणांना सर्व प्रकारे प्रेरणा देणे आहे. याच्या माध्यमातून तरुणांना संवाद, शक्ती आणि समृद्धीचा संदेश मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री मोहन यादव यांनी X वर पोस्ट करत दिली.
ही ३-डी रांगोळी बनवण्यासाठी ४८ तास लागले. ही रांगोळी इंदूरच्या सुप्रसिद्ध कलाकार शिखा शर्मा जोशी आणि त्यांच्या टीमने तयार केली आहे. शिखा शर्मा ही देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदूरची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तिने नेपाळ आणि थायलंडमध्ये उत्कृष्टतेचे पुरस्कार जिंकले आहेत. जयपूरच्या आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवातही तिला सुवर्णपदक मिळाले. शिखा दहावीपासून मुलांना कला शिकवत आहे. तिने जगभरातील सुमारे ७० हजार मुलांना कला शिकवली आहे. तिला रंगोळी क्वीन म्हणून ओळखले जाते.
युवा दिनानिमित्त मध्य प्रदेश राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सकाळी ९:३० ते १०:१५ या वेळेत ऑल इंडिया रेडिओवरून राष्ट्रगीत वंदे मातरम, स्वामी विवेकानंदांचा रेकॉर्ड केलेला ऑडिओ आणि मुख्यमंत्र्यांचा संदेश प्रसारित केला जाईल. यानंतर, रेडिओ प्रसारणात दिलेल्या सूचनांनुसार सामूहिक सूर्यनमस्कार आणि प्राणायाम केले जातील. राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून हा कार्यक्रम एकाच वेळी प्रसारित केला जाईल.