'रेन वॉटर हार्वेस्टिंग'साठी खड्‍डा खोदताना सापडला 'खजिना'!

केरळमधील कन्‍नूर जिल्‍ह्यातील घटना, पुरातत्त्व विभाग करणार पाहणी
Treasure trove
केरळ राज्‍यातील कन्‍नूर जिल्‍ह्यात एका खासगी रबर मळ्यात रोजंदारी महिला कामगारांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग खड्डा खोदताना खजिना सापडला आहे. Twitter

केरळ राज्‍यातील कन्‍नूर जिल्‍ह्यात एका रबर मळ्यात रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी खड्डा खोदताना महिला कामगारांना खजिना सापडला. पुरातत्व विभागाच्या सखोल तपासणीनंतरच त्‍याचे मूल्य स्‍पष्‍ट होणार असल्‍याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

तुर्कीत सापडला ९९ टन सोन्याचा खजिना

सोन्‍या -चांदीची नाणी, मौल्यवान मणी...

कन्‍नूर जिल्‍ह्यातील चेंगलयी येथील एका खासगी रबर मळ्यात महिला रोकामगार रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी खड्डा खोदत होत्‍या. यावेळी त्‍यांना एक डब्‍बा आढळला. सुरुवातीला हा बॉम्‍ब असावा, असा संशय त्‍यांनी व्‍यक्‍त केला. तर काहींना हा 'काळी जादू'चा प्रकार असल्‍याचाही दावा केला. अखेर त्‍यांनी मोठ्या धैर्याने सापडलेला डब्‍बा उघडला. तेव्‍हा त्‍यामध्‍ये सोन्‍या -चांदीची नाणी, मौल्यवान मणी, लॉकेट आढळले.

logo
Pudhari News
pudhari.news