मासिक पाळी, स्तनपान करणाऱ्या, गर्भवती महिलांनी लस घ्यावी? सर्व प्रश्नाची उत्तरे एका ठिकाणी!

पुढारी ऑनलाईन डेस्क 

माझी मासिक पाळी सुरू आहे, मी लस घेऊ शकते का? मी गरोदर आहे तर मी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी का? असे अनेक प्रश्न महिलांना पडले असतील. तर तुमच्या शंकाचे निरसन या पुढील माहितीतून होणार आहे. यासाठी ही माहिती शेवटपर्यंत वाचा.   

महिलांनी मासिक पाळी सुरू असताना लस घ्यायची की नाही. जर या काळात लस घेतली तर त्याचे काही परिणाम माझ्या शरिरावर होतील का?, लसचं घेतली नाही तर? अशा शंका बऱ्याच जणांना आल्या असतील. तसेच सोशल मीडियावरही यासंदर्भातल मेसेज व्हायरल होत आहेत. तुमच्या मनातल्या शंका सोडवण्यासाठी ही खास माहिती तुमच्यासाठी आम्ही येथे देत आहोत.   

कोरोनाच्या  लसीमुळे आपल्या मासिक पाळीवर कुठलाही परिणाम होत नाही किंवा पाळीच्या चक्रावर कुठलाही परिणाम होत नसल्याची माहिती डॉ. गरीमा यांनी दिली आहे. या विषयावर डॉ. गरीमा यांनी 'पुढारी ऑनलाईन'शी  संवाद साधला. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहनही केले. 

डॉ. गरीमा म्हणाल्या, मासिक पाळी येण्याआधी किंवा झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी होते, अशक्तपणा येतो. पण, लस घेतल्यानंतर त्याचा कुठलाही वाईट परिणाम आपल्यावर होत नाही. पण, महिलांनी पाळीच्या काळात लस घेतल्यानंतर आराम करणं, चांगलं ठरेल. तुमच्या हार्मोनल सायकलला या लसीचे वाईट परिणाम होणार नाहीत. 

महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी- 

गरोदर महिलांनी लस घ्यावी की नाही? 

गरोदर महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नये. 

स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घ्यावी का? 

स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये. 

प्रसुती झाल्यानंतर लस घ्यावी का? 

महिलेची प्रसुती झाल्यानंतरही लस घेऊ नये. सहा महिने थांबावे. नंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊनचं लस घ्यावी. 

पीसीओडी, ओवरसीजचा त्रास असताना लस घ्यावी का? 

पीसीओडी, ओवरसीजचा त्रास ही सामान्य बाब ठरली आहे. आपल्या पीसीओडी, ओवरसीज जरी असले तरी लस घेऊ शकतात. तसेच कुटूंब नियोजन करणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरचं निर्णय घेऊ शकता. घाबरून जाऊ नका, मनात शंका आली की, डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण माहिती डॉ. गरिमा यांनी 'पुढारी ऑनलाईन'ला दिली. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news