.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क: सन 2060 पर्यंत भारत जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश असेल. Pew Research च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. सध्या मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत इंडोनेशिया पहिल्या क्रमांकावर आहे.
अहवालानुसार 2060 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येचा 19.4 टक्के हिस्सा मुस्लीम असेल, पाकिस्तानमध्ये 96.5 टक्के आणि बांगलादेशमध्ये 91.9 टक्के मुस्लीम असतील.
77 वर्षांपूर्वी झालेल्या फाळणीत भारत दोन भागांमध्ये विभागला गेला आणि पाकिस्तान एक स्वतंत्र देश बनला.
फाळणीच्या वेळी लाखो हिंदू आणि मुस्लिमांना आपले घर, कुटुंब सोडून एका देशातून दुसऱ्या देशात जावे लागले. फाळणीनंतर पाकिस्तान मुस्लीम बहुल देश बनला आणि भारत हिंदू बहुल देश राहिला.
24 वर्षांनी पुन्हा एक फाळणी झाली आणि पाकिस्तानचा पूर्वेकडील भाग वेगळा झाला, ज्यातून बांगलादेशची निर्मिती झाली.
भारताच्या या फाळणीनंतर निर्माण झालेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये मुस्लीम बहुसंख्य आहेत, तर भारतात मुस्लीम एक अल्पसंख्यांक समुदाय आहे.
तरीही, जगात सर्वाधिक मुस्लीम भारतातच राहतात. पाकिस्तानमध्ये 96.4 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे, तर बांगलादेशमध्ये 90.6 टक्के मुस्लीम आहेत आणि भारतात एकूण लोकसंख्येपैकी फक्त 14.9 टक्के लोक मुस्लीम आहेत. मात्र, आकडेवारीनुसार पाहिले तर या तिन्ही देशांमध्ये सर्वाधिक मुस्लीम भारतातच राहतात.
Pew Research च्या अहवालानुसार भारतात एकूण 19 कोटी 48 लाख 10 हजार मुस्लीम आहेत. पाकिस्तानमध्ये 18 कोटी 40 लाख, तर बांगलादेशमध्ये 14 कोटी 40 लाख 20 हजार मुस्लीम राहतात.
जर भारताची फाळणी झाली नसती आणि पाकिस्तान व बांगलादेश वेगळे देश बनले नसते, तर आज जगात सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश भारत असता. या अहवालात दिलेले लोकसंख्येचे आकडे 2015 सालचे आहेत.
जर हे तीनही देश एकच असते, तर मुस्लीम लोकसंख्या एकूण 52 कोटी 28 लाख 30 हजार असती आणि 35 वर्षांनी ती सुमारे 80 कोटी झाली असती.
Pew Research च्या अहवालात 2060 सालासाठी अंदाज दिला आहे. या अंदाजात तिन्ही देशांच्या मुस्लीम लोकसंख्येचा वाढीचा दर आणि जन्मदर विचारात घेऊन 35 वर्षांनी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात किती मुस्लिम असतील, हे सांगितले आहे.
या अहवालानुसार, 2060 पर्यंत भारत जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश असेल. सध्या इंडोनेशिया पहिल्या क्रमांकावर आहे.
अहवालानुसार 2060 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येचा 19.4 टक्के हिस्सा मुस्लिम असेल, पाकिस्तानमध्ये 96.5 टक्के आणि बांगलादेशमध्ये 91.9 टक्के मुस्लिम असतील.
Pew Research Center च्या अंदाजानुसार, 2060 मध्ये इंडोनेशियामध्ये सुमारे 29 कोटी 90 लाख (299 million) मुस्लीम असतील.
इंडोनेशिया सध्या जगातील सर्वात मोठा मुस्लीम लोकसंख्या असलेला देश आहे, पण 2060 पर्यंत भारत त्या क्रमांकावर पोहोचेल, असा अंदाज आहे. भारतात मुस्लीम लोकसंख्या जास्त वेगाने वाढत असल्याने, भारत इंडोनेशियाला मागे टाकेल.
भारतात 2060 मध्ये अंदाजे 33.3 कोटी मुस्लीम असतील. तर इंडोनेशियात 2060 पर्यंत अंदाजे 29.9 कोटी मुस्लीम लोकसंख्या असेल.
अहवालानुसार या तिन्ही देशांतील मुस्लीम लोकसंख्येची तुलना केली तर सर्वाधिक वाढ भारतात होईल, त्यानंतर बांगलादेश आणि मग पाकिस्तान.
भारतात 35 वर्षांनी 33 कोटी 30 लाख 90 हजार मुस्लीम असतील, पाकिस्तानमध्ये 28 कोटी 36 लाख 50 हजार, आणि बांगलादेशमध्ये 18 कोटी 18 लाख मुस्लीम असतील. जर हे तिन्ही देश एकत्र असते, तर 2060 पर्यंत एकूण मुस्लीम लोकसंख्या 79 कोटी 85 लाख 40 हजार झाली असती.