Wild Animals Smuggling | काळ्या रंगाची खारुताई , इग्वाना असे २९ दुर्मिळ प्रजातीचे प्राणी बॅगेत भरुन आणले! मुंबई विमानतळावरील प्रकार

प्राण्याची अवैध तस्करी, कस्टम्स अधिकाऱ्यांनी घेतले बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला ताब्यात, मेलॅनिस्टिक खार (काळ्या रंगाची खार), बॉल पायथन आणि इग्वाना या प्राण्यांचा समावेश
 तस्करी करुन आणलेले इग्वाना  व गिब्बन माकड
तस्करी करुन आणलेले इग्वाना व गिब्बन माकड
Published on
Updated on

wild animals smuggling मुंबईच्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तस्करीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बँकाक हून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत दुर्मिळ प्रजातीचे २९ प्राणी आढळून आले. कस्टम अधिकाऱ्यांच्या दक्षतेने स्मगलिंगचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रवाशाला अटक करण्यात आले असून , या प्राण्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी वन्यजीव तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये गिब्बन, मेलॅनिस्टिक खार (काळ्या रंगाची खार), बॉल पायथन आणि इग्वाना यांचा समावेश होता. या घटनेमुळे भारतातील विदेशी वन्यजीवांच्या वाढत्या बेकायदेशीर व्यापाराबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

बॅगेमध्ये लपवून ठेवले होते प्राणी

या मोहिमेत सहभागी असलेल्या वन्यजीव अधिकाऱ्यांच्या मते हे प्राणी बॅगांमध्ये कोंबून भरले होते आणि बेकायदेशीररित्‍या देशात आणले गेले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'वाईल्डलाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो' (WCCB) आणि वनविभागाच्या समन्वयाने काम करणाऱ्या 'रेस्कविंक असोसिएशन फॉर वाईल्डलाइफ वेल्फेअर' (RAWW) या संस्थेच्या वन्यजीव तज्ज्ञांच्या मदतीने या प्राण्यांची त्वरित तपासणी करण्यात आली आणि त्यांना शांत करण्यात आहे.

कोंबन भरले होते प्राणी

अवैध तस्करी करताना या प्राण्यांना बॅगेत कोंबून भरले होते यामुळे प्रवासादरम्यान तणाव, दुखापत किंवा प्राणी दगावण्याची शक्यता होती. बॅगेत कोंबून भरल्यामुळे या प्राण्यांचा जीवाला धोका निर्माण झाला होता. तसेच रोग पसरण्याचाही धोका असतो, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

अधिकाऱ्यांनी 'कस्टम्स ॲक्ट, १९६२' आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांमधील संबंधित तरतुदींनुसार या प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे. सुटका करण्यात आलेल्या देशात परत पाठवले जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news