का साधू - संताचे अंत्‍यसंस्‍कार होतात जलसमाधीने ? दहनक्रियेला दिली जाते बगल !

Funeral of Sadhu - saint | जलसमाधीला आहे आध्यामिक परंपरा
Funeral of Sadhu - Sant
राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्‍येंद्र दास File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हिंदू धर्मामध्ये जन्म आणि मृत्‍यू वेळी केले जाणारे धार्मिक संस्‍कार खूप महत्‍वाचे असतात. हिंदू धर्मामध्ये अग्‍निला खूप पवित्र मानले जाते. पंचमहाभूतांपैकी अग्‍नी हा एक आहे. त्‍यामुळे हिंदू मध्ये मृत्‍यू झाल्‍यानंतर पार्थिव शरिरावर अग्‍नीसंस्‍कारच केले जातात. पण हिंदू धर्मामध्ये साधू संत मात्र यासाठी अपवाद आहेत. याबाबतचे विशेष वृत्त ‘आज तक’ने दिले आहे.

१२ फेब्रुवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पूजारी संत्‍येंद्र दास यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्‍यांच्या पार्थिवावर १३ फेब्रूवारी रोजी अंतिम संस्‍कार करण्यात आले. त्‍यांचे अग्‍निसंस्‍कार न करता त्‍यांच्या पार्थिवाला शरयू नदीमध्ये जलसमाधी देण्यात आली. संत्‍येद्र दास यांच्यावर अशाप्रकारे अंतिम संस्‍कार केल्‍यामुळे साधू संतांच्या पार्थिवावर का अग्‍निसंस्‍कार केले जात नाहीत याची चर्चा होत आहे. तर जाणून घेऊ याविषयी

काय असते जलसमाधी ?

सनातन धर्मामध्ये अंतिमसंस्‍कारामध्ये अनेक विधी असतात. त्‍यातच जलसमाधी हा एक प्रकार आहे, यामध्ये पार्थिव शरीरावर अग्निसंस्‍कार न करता ते नदीमध्ये प्रवाहित केले जाते. यावेळी त्‍या साधूंच्या मृत शरिरावर दगड बांधले जातात. ज्‍यामुळे ते पार्थिव तळापर्यंत पोहचेल.

जलसमाधी घेण्यामागे काय आहे कारण ?

हिंदू धर्मामध्ये जल खूप पवित्र मानले जाते. कोणताही विधी असूदे पाण्याशिवाय पूर्ण होत नाही, मंगल कार्य असूदे किंवा, यज्ञकर्म, दुखःद प्रसंगी करावयाचे विधी असूदेत या सर्वांसाठी जल किंवा पाणी याला खूप महत्‍व आहे. जलाची देवता वरुण आहे जे भगवान विष्‍णूचे स्‍वरुप मानले जातात. यामुळे पाण्याला प्रत्‍येक रुपात पवित्र मानले गेले आहे. प्रत्‍येक शुभ कार्याची सुरवात जलाने होते. शास्‍त्रांच्या मान्यतेनुसार पृथ्‍वीच्या प्रारंभी पण पाणीच होते व सृष्‍टीच्या अंतालाही पाणीच राहणार आहे. पाणी हेच अंतिम सत्‍य आहे. त्‍यामूळे देवी देवतांच्या मूर्ती यांचे विसर्जन पाण्यातच केले जाते. जेव्हा मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते तेव्हा ती जलमार्गेच देवलोकात जाते अशी मान्यता आहे.

आहे आध्यामिक परंपरा

हिंदू परंपरेनुसार साधूंचे शरीर ध्यान धारणेणे अधिक उर्जावान बनलेले असते त्‍यामुळे त्‍यांचे पार्थिव जलसमाधीद्वारे प्रकृतीत विलीन केले जाते. प्राचिन काळापासून ही परंपरा चालत आली आहे. ॠषी- मुनीही जलसमाधी घेत असत. काही ॠषी महिनोंमहिने जलतपस्‍या करत असत. पाण्यामध्ये ध्याणधारणा करणे हेही प्राचिन काळापासून चालत आलेले आहे. अनेक दिवस, महिने हे ॠषी पाण्यात उभे राहून किंवा बसून ध्यान करत.

मानवाचे शरीर हे पृथ्‍वी जल अग्‍नि वायू आणि आकाश या पंचतत्‍वांनी बनलेले आहे. साधू संताचे जीवन त्‍याग आणि समर्पण यांनी भरलेले असते. खरे साधू हे मोह माया यापासून कोसो दूर असतात संयम, तपस्‍या, योग यांच्यावर त्‍यांचे जीवन आधारलेले असते. या सर्व कारणांमूळे अग्‍नी संस्‍काराला बगल देत त्‍यांच्या पार्थिवाला जलसमाधी दिली जाते. भारतातील गंगा, नर्मदा, यमुना, गोदावरी अशा नंद्यांना पवित्र समजले जाते त्‍यांना मोक्षाचा मार्ग मानले जाते. या मान्यतेमूळे या नद्यांमध्ये साधू संतांच्या पार्थिवांना जलसमाधी दिली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news