Who is Shankh Mitra : कोलकाताचा मुलगा बनला जगातील दुसरा सर्वाधिक महागडा CEO; मस्क यांच्यानंतर शंख मित्रांची चर्चा!

वर्षाला ७७५० कोटींचे पॅकेज, इलॉन मस्क यांच्‍यापाठोपाठ नंबर
Who is Shankh Mitra : कोलकाताचा मुलगा बनला जगातील दुसरा सर्वाधिक महागडा CEO; मस्क यांच्यानंतर शंख मित्रांची चर्चा!
Published on
Updated on

नवी दिल्‍ली : जेव्हाही जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक पगार घेणाऱ्या व्यक्तीचे नाव येते तेव्हा सगळ्यांच्या डोक्यात इलॉन मस्क यांचा चेहरा आठवतो. मस्क सध्या जगातील सर्वात महागडे ‘सीईओ’ आहेत. मात्र त्यानंतर दुसऱ्या नंबरवर भारतीय वंशाच्या एका व्यक्तीचे नाव घेतले जाते. कोलकाताहून निघून जगात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यश मिळवणारे शंख मित्रा असे त्यांचे नाव आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने अलीकडेच एक रिपोर्ट प्रकाशित केला आणि त्यानंतर शंख मित्रा हे नाव चर्चेत आले आहे.

शंख मित्रा यांच्या प्रचंड पगारापैकी जवळपास ९९ टक्के रक्कम रोख स्वरूपात नसून कंपनीच्या स्टॉक ग्रँटच्या स्वरूपात आहे. हे शेअर्स पूर्णपणे मिळवण्यासाठी काही विशिष्ट अटी आहेत. जर ते २०३१ पर्यंत कंपनीत काम करत राहिले तर त्यांना निम्मे शेअर्स मिळतील. त्याशिवाय जर कंपनीने पुढील पाच वर्षांत बाजारात ४५ टक्के वाढ साधली तर उर्वरित निम्मे शेअर्स दिले जातील.

इलॉन मस्कसोबत का होतेय तुलना?

ही तुलना कोणत्याही व्यावसायिक स्पर्धेमुळे नाही तर सर्वाधिक पगार घेणाऱ्या व्यक्तींच्या यादीमुळे आहे. टेस्लाचे मालक इलॉन मस्क १५८ अब्ज डॉलर्सच्या पगारासह या यादीत अव्वल स्थानी आहेत आणि त्यांच्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी भारतीय वंशाचे शंख मित्रा आहेत. त्यांनी जगातील अनेक मोठ्या टेक आणि फायनान्स कंपन्यांच्या प्रमुखांनाही मागे टाकले आहे.

कोलकाता ते अमेरिका प्रवास?

१९८१ मध्ये जन्मलेले शंख मित्रा यांनी आपले बालपण पश्चिम बंगालमध्ये घालवले. त्यांनी कोलकाताच्या नामांकित जादवपूर विद्यापीठातून इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि नामांकित कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी मिळवली. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्राईस वॉटरहाऊस कूपर्स (PwC) येथे केली. त्यानंतर फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटस्‌ आणि सिटाडेल यांसारख्या अग्रगण्य वित्तीय कंपन्यांमध्ये काम केले. २०१६ मध्ये ते वेलटॉवरमध्ये सामील झाले आणि आपल्या उत्कृष्ट निर्णयांच्या आणि नेतृत्वाच्या जोरावर ऑक्टोबर २०२० मध्ये ते कंपनीच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच सीईओ पदावर पोहोचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news