Radhika Merchant | अनंत अंबानीची वधू राधिका कोण आहे? तिचे आईवडील कोण आहेत?

राधिका किती शिकली आहे, तिला कशाची आवड आहे?
Who is Radhika Merchant? Anant Ambani's bride
अनंत अंबनी आणि राधिक मर्चंट यांचा विवाह १२ जुलैला होत आहे. Instagram @rheakapoor

मुकेश आणि नीता अंबनी यांची भावी लहान सून राधिका मर्चंट सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. अनंत अंबानीसोबत १२ जुलैला राधिकाचा विवाह होत आहे. राधिका मर्चंट नेमकी कोण आहे, याबद्दल सध्या लोकांमध्ये बरेच कुतुहल आहे.

लग्नसोहळा कधी आहे?

अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचे लग्न १२ जुलैला होत आहे. त्यांचा साखरपुडा जानेवारी २०२३ला झाला. सध्या प्री वेडिंगचे विविध कार्यक्रम होत असून यासाठी जगभरातील दिग्गजांची उपस्थितीती आहे.

राधिकाचे आईवडील होण आहेत?

राधिका ही विरेन आणि शैला मर्चंट यांची कन्या आहे. विरेन मर्चंट Encore Healthcare चे सीईओ आहेत, आणि देशातील अब्जाधिशांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. Encore Natural Polymers, Encore Business Centre Private Limited अशा विविध कंपन्यांचे ते मालक आहेत. तर शैला मर्चंट या Encore Healthcareच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. मर्चंट कुटुंबीयांची नेटवर्थ जवळपास ७०० कोटी रुपयांची आहे.

राधिका मर्चंटे शिक्षण किती?

राधिका मर्चंट हिचे शिक्षण न्यू यॉर्क विद्यापीठातून झालेले आहे. तसेच तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. राधिकाचा जन्म १८ डिसेंबर १९९४ला मुंबईत झाला. शालेय शिक्षण द कॅथेड्रल अँड जॉन कोनॉन स्कूल येथून झाले आहे, तर उच्च माध्यमिक शिक्षण बी. डी. सोमानी इंटरनॅशनल स्कूल येथे झाले आहे. राधिकाने न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीतून २०१७मध्ये राज्यशास्त्र विषयात डिग्री घेतली आहे.

भरतनाट्यमचे प्रशिक्षण

मुंबईतील श्री निभा आर्टस या संस्थेतून तिने ८ वर्षं भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. भावना ठक्कर या तिच्या गुरू आहेत.

प्राण्यांबद्दल विशेष आवड

राधिकाला प्राण्यांबद्दल विशेष आवड आहे. अनंत अंबानी यांच्या मुलाखतीत याचा उल्लेख आहे. "मी लहानपणापासून प्राण्यांची काळजी घेतो, त्यामुळे लग्न करण्याचे माझ्या मनातही नव्हते. पण जेव्हा राधिकाची भेट झाली तेव्हा लक्षात आले की माझे आणि तिचे विचार एकसारखे आहेत. प्राण्यांबद्दल तिच्या मनात दया भावना आहे," असे अनंत अंबनी यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news