Audio Spy Device | सावधान, सर्वांचीच 'प्रायव्हसी' धोक्यात! काय आहे 'ऑडिओ स्पाय डिव्हाइस'?

Audio Spy Device | प्रायव्हसीचा शत्रू ठरणाऱ्या ऑडिओ स्पाय डिव्हाइसची ऑनलाईन स्टोअर्सवर होत आहे मोठ्याप्रमाणात विक्री
Audio Spy Device
Audio Spy DevicePudhari online
Published on
Updated on

आजच्या डिजिटल युगात माहितीचा सहज व वेगवान प्रसार होतो आहे. तंत्रज्ञानाच्या या प्रगतीत "ऑडिओ स्पाय" म्हणजेच आपला आवाज गुप्तपणे रेकॉर्ड करणारी उपकरणे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. काही वेळा ही उपकरणे सुरक्षा, देखरेख किंवा तपासणीसाठी उपयोगी पडतात, तर काही वेळा त्यांचा गैरवापर देखील होऊ शकतो. याचा वापर करत ऑफिस मिटिंग, घरातील खाजगी संभाषण, किंवा वैयक्तिक क्षण कुणीतरी गुपचूप रेकॉर्ड करू शकतं.

तंत्रज्ञान जसे प्रगत होत आहे, तशीच त्याचा गैरवापर होण्याची शक्यता देखील वाढत आहे. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे ऑडिओ स्पाय डिव्हाइस. या गॅझेट्सच्या मदतीने कोणाच्याही नकळत त्यांचे बोलणे रेकॉर्ड केले जाऊ शकते, आणि यामुळे सर्वांची प्रायव्हसी धोक्यात येत आहे. यामुळे सतत लोकांना वाटू लागलं की त्यांचं बोलणं रेकॉर्ड केलं जाऊ शकतय, तर संवाद कमी होत जाईल.

ऑडिओ स्पाय म्हणजे काय?

ऑडिओ स्पाय उपकरण हे असे एक लहान, हलके, पोर्टेबल गॅझेट असते जे गुप्तपणे आवाज रेकॉर्ड करू शकते. यामध्ये आवाज टिपण्याची क्षमता असते आणि काही डिव्हाइसेस थेट मोबाईल किंवा संगणकाला कनेक्ट करून लाइव्ह ऑडिओ देखील ट्रान्सफर करू शकतात. हे डिव्हाइस आपल्याला पेन, खेळणी, पेनड्राईव्ह, युएसबी ड्राइव्ह, बटण, की-चेन, घड्याळ यासारख्या वस्तूंमध्ये लपवलेली असतात.

Audio Spy Device
Audio Spy Device

कसा करतात वापर?

ऑडिओ स्पाय उपकरणाचा वापर खालील प्रकारे केला जातो:

  • सिक्रेट रेकॉर्डिंगसाठी: संवाद, मिटिंग्स, किंवा कोणत्याही संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी.

  • सुरक्षा तपासणीसाठी: खाजगी तपास संस्था किंवा पोलिस दल वापरतात.

  • पाळत ठेवण्यासाठी: घरगुती कामगार, बेबी सिटर, किंवा वृद्ध लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी.

किंमत किती? 

ऑडिओ स्पाय डिव्हाइसची किंमत त्यांच्या गुणवत्तेवर व फिचर्सवर अवलंबून असते.

  • साधे रेकॉर्डिंग डिव्हाइसेस: ₹500 ते ₹2,000 दरम्यान

  • उच्च दर्जाचे गॅझेट्स (लांब रेंज, नॉईस कॅन्सलेशन, मोठी मेमरी): ₹3,000 ते ₹15,000 किंवा त्यापेक्षा अधिक

जाणून घ्या, काय सांगतो कायदा

भारतामध्ये किंवा इतर देशांमध्ये कोणताही संवाद गुप्तपणे रेकॉर्ड करणे हे अनेक वेळा कायद्याच्या विरुद्ध असते, विशेषतः त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय. मात्र केवळ भारताताचा विचार केल्यास भारतीय कायद्यानुसार, कोणाच्याही संमतीशिवाय त्यांचं बोलणं रेकॉर्ड करणं हे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन ठरतं आणि ते बेकायदेशीर ठरू शकतं. यावर काही कलमांच्या अधारे गुन्हा नोंद केला जाऊ शाकतो.

ऑडिओ स्पायचा गैरवापर करताय ?  जाणून घ्या कायदा आणि शिक्षा 

  • भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act)

  • भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत गोपनीयतेचा भंग झाल्यास गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.

  • कलम 500 – बदनामी (Defamation)

  • कलम 507 – धमकी देण्यासाठी अनामिक संप्रेषण

1. भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 (Information Technology Act, 2000) कलम 66E (Section 66E)

गुन्हा: कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती (जसे की आवाज, प्रतिमा, इ.) परवानगीशिवाय हस्तगत करणे किंवा प्रसारित करणे.

शिक्षा:

  • 3 वर्षांपर्यंत कारावास

  • किंवा ₹2,00,000/- पर्यंत दंड

  • किंवा दोन्ही

2. भारतीय दंड संहिता (IPC)

कलम 354C – Voyeurism (छुप्या पद्धतीने निरीक्षण)

हे मुख्यतः स्त्रियांच्या गोपनीयतेच्या संदर्भात वापरले जाते.

शिक्षा:

  • पहिल्यांदा गुन्हा: 1 ते 3 वर्षे कैद + दंड

  • पुन्हा गुन्हा केल्यास: 3 ते 7 वर्षे कैद + दंड

कलम 500 – बदनामी (Defamation)

जर गुप्त रेकॉर्डिंगचा वापर करून एखाद्याची प्रतिष्ठा कमी करण्यात आली, तर

शिक्षा:

  • 2 वर्षांपर्यंत कारावास

  • किंवा दंड

  • किंवा दोन्ही

कलम 507 – धमकी देण्यासाठी अनामिक संप्रेषण

ऑडिओ क्लिप वापरून ब्लॅकमेल किंवा धमकी दिल्यास

शिक्षा:

2 वर्षांपर्यंत अतिरिक्त शिक्षा, मूळ शिक्षेशिवाय

महत्वाची टीप:

  • हे सर्व गुन्हे गंभीर स्वरूपाचे मानले जातात.

  • आरोपीला अटक होऊ शकते.

  • पुरावे (ऑडिओ, डिव्हाइस, मेसेजेस) जप्त केले जाऊ शकतात.

हे लक्षात ठेवा...

  • वैयक्तिक वापरासाठी – संमती असल्यास वापर शक्य.

  • सार्वजनिक ठिकाणी – नियम स्पष्ट नाहीत, परंतु सावधगिरी आवश्यक.

  • न्यायिक तपासणीसाठी – फक्त अधिकृत यंत्रणांनाच परवानगी असते.

यामुळे ऑडिओ स्पाय डिव्हाइस वापरण्याआधी स्थानिक कायदे व नियम तपासणे अत्यावश्यक आहे.

उपाय काय?

  • जागरूक राहणे: संशयास्पद वस्तूंवर लक्ष ठेवणं.

  • RF डिटेक्टरचा वापर: गुप्त रेकॉर्डिंग उपकरण शोधण्यासाठी खास डिव्हाइस वापरणं.

  • कायद्याची माहिती ठेवणे: अशा घटनांची तक्रार करण्यासाठी कायद्यानुसार पावलं उचलणं.

कुठे विकत घेता येतील?

  • ऑनलाईन स्टोअर्स: Amazon, Flipkart, Snapdeal, SpyKart, आदि वेबसाइट्सवर वेगवेगळे प्रकार सहज मिळू शकतात.

  • स्पेशल गॅझेट शॉप्स: मोठ्या शहरांतील गॅझेट शॉप्स किंवा खाजगी सुरक्षा उपकरण विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये.

  • व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस डीलर्स: काही डीलर्स थेट ऑर्डरवरही उत्पादने देतात.

सूचना:

ऑडिओ स्पाय उपकरणांचा गैरवापर केल्यास संबंधित कायद्यांनुसार कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे कोणतेही गुप्त रेकॉर्डिंग करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची संमती घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ते गोपनीयतेचा भंग ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news