पुढारी ऑनलाईन डेस्क : सुनीता विलियम्स (Sunita Williams) पृथ्वीवर सुरक्षित परतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्ट करत त्याच्या दृढनिश्चयाचे त्यांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "त्यांच्या अनुभवाने धैर्य आणि अमर्याद मानवी क्षमतेची परीक्षा घेतली आहे. चिकाटी या शब्दाचा खरा अर्थ काय असतो हे सुनीता विलियम्स आणि क्रू 9 च्या अंतराळवीरांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिले आहे. प्रचंड अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा अढळ दृढनिश्चय लाखो लोकांना कायम प्रेरणा देईल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
"अंतराळ संशोधन म्हणजे मानवी क्षमतेच्या सीमा ओलांडणे, स्वप्न पाहण्याचे धाडस करणे आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे धाडस करणे. सुनीता विल्यम्स या एक आदर्श आहेत. त्याने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत या भावनेचे उदाहरण दिले आहे. त्यांचे अंतराळातून पृथ्वीवर सुरक्षित परतणे सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या प्रत्येकाचा आम्हाला अविश्वसनीय अभिमान आहे," असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आहे.