

श्रीनगर : वृत्तसंस्था
काश्मीर खोर्यात जेव्हा-जेव्हा नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आले, तेव्हा-तेव्हा दहशतवादाला खतपाणी मिळाले. या दोन्ही पक्षांना कलम 370 पुन्हा हवे आहे. भाजप आहे तोवर 370 कलम तर येणारच नाहीच, पण दहशतवादालाही आम्ही खोल जमिनीत गाडून टाकू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागसैनी येथील जाहीर सभेत केले. शहा म्हणाले, कलम 370 आता इतिहासजमा झालेले आहे. राज्यघटनेत त्याला स्थान नव्हते आणि असणार नाही. एका देशात दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज असूच शकत नाहीत, यावर आम्ही ठाम आहोत. तिरंगा हा आपला एकच एक ध्वज आहे आणि तो आम्हाला प्राणांहून प्रिय आहे.
कलम 370 पुन्हा बहाल झाले, तर येथील एससी/एसटी/ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे, असेही शहा यांनी सांगितले. किश्तवाड, रामबनमध्येही शहा यांच्या प्रचार सभा झाल्या.