

पुढारी ऑनलाईन डेस्क :
तामिलागा वेट्री कळघम पक्षाचे प्रमुख व अभिनेते विजय यांनी भाजपाचा अजेंडा असलेल्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ या मोहिमेला विरोध दर्शविला आहे. या पक्षाचा कार्यकारी मंडळाची सभा पार पडली यामध्ये या केंद्र सरकाच्या या मोहिमेला विरोध करण्याचा ठराव करण्यात आला. या सभेमध्ये तामिळनाडूमध्ये निट परीक्षा मागे घेण्याची केंद्राकडे मागणी करण्याचा ठरावही करण्यात आला. इंडिया टुडेने यांसदर्भात वृत्त दिले आहे.
राज्यातील डीएमके सरकार हे जातनिहाय जनगनना करु शकत नाही त्यांनी निवडणूक आश्वासंने दिली होती पण त्यापैकी एकही ते पूर्ण करु शकलेले नाही. खोटे बोलून ते सत्तेत आले आहेत. पक्षाच्या धेय धोरणामध्ये सामाजिक न्याय, समानता, धर्मनिरपेक्षता या गोष्टींना आम्ही अधिक महत्व दिले आहे. तसेच राज्यपाल हे पद आम्हाला हटवायचे आहे असेही विजय यांनी स्पष्ट केले.
आमच्या पक्षाचे तत्वज्ञान हे द्रवीडीझम व तामीळ राष्ट्रवाद या दोन्हीकडून प्रेरीत आहे. आमचे ‘डोळे नेहमी मातीकडे राहतील’ तसेच पक्ष एका ठराविक साच्यात न अडकवता एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाज सुधारणा या व्यापक मुल्यांचे पालन करणार आहे. तसेच यावेळी विजय यांनी २०२६ मध्ये तामिळनाडूत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका लढवणार असल्याचे घोषित केले.