Wayanad Landslide | वायनाडमध्ये प्रचंड भूस्खलन : ३ जणांचा मृत्‍यू सात बेपत्ता, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा!

नैसर्गिक आपत्तीचा थरार सिसिटीव्हीत कैद, मोठी वाहने खेळण्यातील वाहनांसारखी गेली वाहून, बचावकार्य सुरु, एनडीआरएफचे पथक दाखल
Wayanad Landslide
Wayanad Landslide
Published on
Updated on

Wayanad Landslide केरळमध्ये आज झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड भूस्खलन झाले आहे. मेप्पडीजवळच्या कल्लाडी येथे ही घटना घडली असून यामध्ये तिन जणांचा जागीच मृत्‍यू झाला असून, सात जण बेपत्ता आहेत, हे भूस्खन होत असतानाचे सीसीटीव्ही समोर आले असून हा भीषण व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. या घसरत आलेल्या मातीच्या दाबाने एक ट्रक खेळण्यातील वाहनाप्रमाणे घसरत येताना दिसत आहे. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये ही नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की कल्लाडी बोगद्याच्या बांधकाम स्थळावरील उत्खननादरम्यान साचलेला मलबा खाली कोसळला. मीनाक्षी पुलाजवळ ही भूस्खलनाची घटना घडली. येथे प्रस्तावित वायनाड-मलप्पुरम बोगदा रस्ता प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते. कालपासून या ठिकाणी काम थांबवण्यात आले होते.गेल्या २४ तासांत या परिसरात २६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे यामुळे हे भूस्खलन झाले आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात फिरणारे लोक भूस्खलनात सापडल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती,

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (केएसडीएमए) म्हणण्यानुसार, या मातीच्या ढिगाऱ्याखाली अजून काही लोक अजूनही गाडले असल्याची शक्यता आहे. तसेच या मातीच्या लोढ्यांत एक चर्च, एक चहाची टपरी आणि बसस्थानक गाडले गेल्याची माहिती समोर आली आहे अग्निशमन आणि बचाव सेवा कर्मचारी, पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) च्या टीम घटनास्थळी पोहोचल्या असून त्‍यांनी बचाव कार्य सुरु केले आहे.

अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु - प्रियंका गांधी

'भूस्खलनात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री व्ही.डी. सठेसन स्वतः मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. पोलिस आणि एनडीआरएफची टीम काही काळ घटनास्थळी हजर होती आणि एसडीआरएफ टीम आणि नागरी संरक्षण कर्मचारीही तिथे पोहोचले आहेत. अशी माहिती वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news