

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचाराची कोलकाता उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. येथे केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावे असा आदेश न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती वकील अनिश मुखर्जी यांनी आज सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली. वकील अनिश मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची बाजू न्यायालयात मांडली.
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्याविराेधात गेले तीन दिवस आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनाला हिंसक वळण लागले. हिंसाचारात तीन जणांचा बळी गेला असून मृतांमध्ये पिता- पुत्राचा समावेश आहे. या प्रकरणी आतापर्यंत ११८ जणांना अटक करण्यात आली आहे.र हिंसाचारग्रस्त भागात इंटरनेट सेवा खंडीत केली असून संचारबंदीही लागू केलीआहे.
याबाबत अधिक माहिती अशी की वक्फ विधेयकाविरोधत आंदोलनादरम्यान मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमशेरखंड विभागातील जाफराबाद येथे हिंसाचार भडकला. पीटीआयच्या वृत्तानुसार, हत्या झालेल्या पितापुत्रांचे मृतदेह त्यांच्या घरामध्ये मिळून आले. त्यांच्या शरीरावर चाकून अनेक वार केल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले. घरी लूटमारही करण्यात आली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ सुधारण विधेयक राज्यात लागू करण्यास ठाम विरोध केला आहे. ‘मी हे विधेयक राज्यामध्ये लागू करणार नाही हे स्पष्ट केले असूनही हा हिंसाचार होत आहे. याल जबाबदार कोण’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या आंदोलनादरम्यान गोळीबारीही झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या मतानुसार समसेरगंज येथे मोठ्या प्रमाणात हिंसा भडकली आहे.पोलिस महानिरीक्षक जावेद शमीम यांनी सांगितले की, हिंसाचारावेळी समाज कंटकांनी गोळीबार केला. हिंसाचारातील जखमींवर उपचार सुरु आहेत.