जम्मू-काश्मीरच्या 40 जागांसाठी आज मतदान

संसद हल्ल्यातील अफजल गुरूचा भाऊ मैदानात
Jammu Kashmir Vidhansabha election
जम्मू-काश्मीरच्या 40 जागांसाठी आज मतदानPudhari Photo
Published on
Updated on

श्रीनगर : वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात मंगळवारी 7 जिल्ह्यांतील 40 विधानसभा मतदार संघांसाठी मतदान होणार आहे.

Jammu Kashmir Vidhansabha election
बिगुल वाजलं...! हरियाणा, जम्मू- काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांसाठी 'या' तारखेला मतदान

लोकशाहीच्या वाटेवर

  • संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफजल गुरू याचा मोठा भाऊ एजाज अहमद हाही सोपोरमधून निवडणुकीच्या रिंगणात आहे.

  • इंजिनिअर रशीदचा भाऊ खुर्शीद अहमद शेख हा लंगेटमधून निवडणूक लढवत आहे.

ही कारवाई

  • आचारसंहिता भंगप्रकरणी 23 सरकारी अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. 6 कंत्राटी कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आले आहे.

  • यंत्रणांनी 130 कोटी रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी सर्वाधिक 107.50 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Jammu Kashmir Vidhansabha election
उमरान मलिक : जम्मू काश्मीरच्या या गोलंदाजाच्या वेगाने सर्वांनाच लावले वेड !

आकडे बोलतात

  • 40 जागांपैकी 24 जागा जम्मू, तर 16 काश्मीरमधील आहेत

  • 415 उमेदवार या टप्प्यात रिंगणात आहेत

  • 387 पुरुष, तर 28 महिला उमेदवार आहेत

  • 39.18 लाख मतदार आपला हक्क बजावतील.

  • 169 उमेदवार कोट्यधीश असून,

  • 67 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत

  • 126 कोटींच्या संपत्तीसह जम्मूतील नगरोटाचे भाजप उमेदवार देवेंद्रसिंह राणा सर्वाधिक श्रीमंत आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news