

नागपूर : बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शेजारच्या प्रांतातून गोवंशाची तस्करी केली जाते. पोलीस यंत्रणेने त्यावर वेळीच प्रतिबंध घालावा, यासोबतच बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देखील थांबविली जावी, आपण संबंधितांशी केलेल्या चर्चेनुसार कुराणात या दिवशी बकरा कापलाच पाहिजे, असा कुठलाही उल्लेख नाही असा दावा विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र, गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केला.
बकरी ईदच्या निमित्ताने लाखो बकरी, बकरे किंवा इतरही काही प्राणी आणि गोवंश हत्यादेखील केली जाते. हा मोठा धोका असून पर्यावरणवाद्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले.