VHP vs Owaisi: नवी दिल्लीत ओवेसींविरोधात विहिंप, बजरंग दल आक्रमक

संसदेत 'जय पॅलेस्टाईन' घोषणा दिल्याबद्दल निषेध
Protest by MP Asaduddin Owaisi
खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा विहिंप आणि बजरंग दलाच्या वतीने निषेध करण्यात आला. ANI Photo

दिल्ली: पुढारी ऑनलाईन: संसदेत शपथविधी सोहळ्यादरम्यान 'जय पॅलेस्टाईन' अशी घोषणा दिल्याबद्दल एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आज (दि.३०) निषेध करण्यात आला. नवी दिल्लीतील 34 अशोक रोड येथील ओवेसी यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

Protest by MP Asaduddin Owaisi
नवी दिल्ली : भाजप राष्ट्रीय अध्यक्षपद निवड, कोणाची लागणार वर्णी?

सदस्यत्वापासून अपात्र ठरवण्याबाबत राष्ट्रपतींकडे तक्रार

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर संसदेत पॅलेस्टाईनवर विश्वास दाखवणे आणि इतर प्रसंगी जय इंडिया न बोलणे या मुद्द्यावरून भाजपसह विविध संघटनांकडून ओवेसी यांच्यावर टीका होत असताना ओवेसी यांनी संसद सदस्य म्हणून शपथ घेताना जय पॅलेस्टाईन म्हटले होते. या प्रकरणाबाबत त्यांना संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवण्याबाबत राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यात आली आहे.

Protest by MP Asaduddin Owaisi
नवी दिल्ली : कच्च्या तेलावरील विंडफॉल कर कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

देशाचे विभाजन करण्याची ही घातक प्रवृत्ती

विहिंपचे प्रदेश सरचिटणीस सुरेंद्र गुप्ता म्हणाले की, देशाचे विभाजन करण्याची ही घातक प्रवृत्ती आहे, ज्यामुळे देशाचे विभाजन झाले. खेदाची गोष्ट म्हणजे ओवेसी हे खासदार आहेत, ज्यांच्यासाठी राज्यघटना आणि देश सर्वोच्च असला पाहिजे, पण त्यांच्यासाठी त्यांचे राजकारण अधिक महत्त्वाचे आहे. देशाचे विभाजन करण्याचे हे राजकारण आता मान्य होणार नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news