100 Percent Ethanol Fuel | शंभर टक्के इथेनॉलवर आता धावणार वाहने

केंद्र सरकारची मंजुरी; मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती
100 Percent Ethanol Fuel |
100 Percent Ethanol Fuel | शंभर टक्के इथेनॉलवर आता धावणार वाहने
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : बहुमूल्य परकीय चलन वाचवणे आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील परावलंबित्व कमी करणे या प्रमुख कारणांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स फ्युएल वाहनांना परवानगी दिली आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यात केलेल्या दुरुस्तीला केंद्र सरकारने सोमवारी मंजुरी दिली.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या वर्गीकरणाचे निकष, इंधनाचे तपशील आणि उत्सर्जन संबंधित तक्त्यांमध्ये व चाचणी तरतुदींमध्ये वापरले जाणारे तांत्रिक संदर्भ बदलले आहेत. याव्यतिरिक्त सरकारने हलक्या पेट्रोल व डिझेल वाहनांसाठी वजनाची मर्यादा तीन हजार किलोवरून वाढवून साडेतीन हजार किलो केली आहे. जून महिन्यात मारुती सुझुकी इंडियाने वॅगनआर फ्लेक्स फ्युएल ही देशातील पहिली ई-२० ते ई-१०० पर्यंतच्या इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालणारी फ्लेक्स फ्यूएल प्रवासी कार सादर केली. सरकार इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्‍या वापर वाढीवर भर देत असून, यापूर्वीच ई-२० इंधन (२० टक्के इथेनॉल व ८० टक्के पेट्रोल) उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ई-८५ व ई-१०० हे उसाचा रस किंवा धान्यापासून बनवले जाणारे पर्यावरणपूरक ‘बायो इथेनॉल’ इंधन प्रकार आहेत.

ई-८५ व ई-१०० नेमके काय?

ई-८५ : ८५ टक्के इथेनॉल व १५ टक्के पेट्रोल यांचे मिश्रण. सामान्य पेट्रोलपेक्षा प्रति लिटर सुमारे २० रुपयांनी स्वस्त.

ई-१०० : १०० टक्‍के शुद्ध इथेनॉल इंधन. पेट्रोलचे प्रमाण नगण्य किंवा शून्य.

महत्त्वाचे : हे इंधन सामान्य पेट्रोल किंवा ई-२० गाड्यांमध्ये चालणार नाही. यासाठी याच इंधनासाठी डिझाईन केलेली ‘फ्लेक्स फ्युएल वाहने’ आवश्यक.

अंमलबजावणी :

ई-८५ : ५ जून २०२६ रोजी शुभारंभ. दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे व नागपूरमधील निवडक इंडियन ऑईल आऊटलेटस्‌वर उपलब्ध.

ई-१०० : रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणांसह अधिकृत मंजुरी. यामुळे १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या भारतात लाँचिंगचा मार्ग मोकळा.

भविष्यातील विस्तार : डिसेंबरअखेरपर्यंत प्रमुख शहरांत ५०० वर इंधन स्टेशन्स. २०२७ च्या अखेरपर्यंत देशभरात ५ हजारहून अधिक आऊटलेटस्‌.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news