

Vande Bharat Train Fine भारतीय रेल्वे स्टेशनवर लोक अशा अविर्भावात वावरतात की ट्रेन घरची आहे. नियम न पाळणे रेल्वेमधून विनाकारणस फिरणे, प्लॅटफॉर्म तिकीट नसणे, विनातिकीट प्रवास हे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. पण उत्तरप्रदेशमधील कानपूर रेल्वे स्टेशनवील घटना वाचून तुम्हालाही हसू येईल. रेल्वेत पाहूण्यांना निरोप देण्यासाठी गेलेल्या १२ जणांना चांगलाच धडा मिळाला आहे. साधी रेल्वे समजून हे नातेवाईक आपल्या पाहूण्यांना बसवण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चढले होते. पण ही ॲटोमॅटीक ट्रेन असून याचे दरवाजे हे वेळ झाले की आपोआप बंद होतात. असेच घडले व हे १२ जण ऑटोमॅटिक दरवाजे बंद झाल्यामुळे थेट ट्रेनमध्येच अडकून पडले.
७९ मिनीटे व १३९ किलोमिटर प्रवास
दरवाजे बंद झाल्या नंतर यांची धडपड सूरु झाली पण ट्रेनने लगेच वेग पकडला. प्रयत्न करुन ही यांची चांगलीच पंचायत झाली. ज्या पाहूण्यांना सोडायला आले होते त्यांच्याबरोबरच यांना प्रवास करण्याची वेळ आली. शेवटी अखेर इटावा जंक्शनवर या हायटेक ट्रेनचा विना-नियोजित थांबा घेऊन या सर्वांना खाली उतरवण्यात आले आणि त्यांच्याकडून तब्बल ३६,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी भारतीय रेल्वेकडून सध्या देशभरात अत्याधुनिक 'वंदे भारत एक्स्प्रेस' चालवल्या जात आहेत. मात्र, या हायटेक ट्रेनच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा फटका बसू शकतो, याचा प्रत्यय कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकावर आला. रविवारी सकाळी वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक २२४१५) कानपूर स्थानकावर उभी होती. यावेळी आपल्या नातेवाईकांना आणि कुटुंबीयांना डब्यात बसवून देण्यासाठी १२ जण ट्रेनमध्ये चढले. मात्र, सकाळी ९:३० वाजता ट्रेन सुटण्याची वेळ होताच ट्रेनचे ऑटोमॅटिक दरवाजे बंद झाले आणि हे सर्वजण बाहेर पडण्याआधीच गाडीने वेग पकडला.
७९ मिनिटांचा प्रवास आणि इटावा स्थानकावर तातडीचा थांबा
सामान्य रेल्वे गाड्यांमध्ये अनेकदा ट्रेन सुरू झाल्यानंतरही लोक धावत बाहेर पडतात. मात्र, वंदे भारत ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे असल्याने या १२ जणांची मोठी पंचायत झाली. त्यांनी ट्रेनमधील कर्मचाऱ्यांकडे गाडी थांबवण्याची विनंती केली, परंतु ही हायटेक ट्रेन तातडीने थांबवता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. डब्यात प्रवाशांचा गोंधळ वाढत असल्याचे पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांनी टूंडला कंट्रोल रूमला याची माहिती दिली. अखेर कानपूरमधून निघाल्यानंतर तब्बल ७९ मिनिटांच्या प्रवासानंतर सकाळी १०:५० च्या सुमारास इटावा जंक्शनवर विना-नियोजित थांबा घेऊन ही ट्रेन थांबवण्यात आली.
विनातिकीट, गोंधळामुळे ३६ हजारांचा दंड
कानपूर सेंट्रल ते इटावा जंक्शन हे अंतर सुमारे १३९ किलोमीटर आहे. इटावा स्थानकावर ट्रेन थांबताच या १२ जणांना खाली उतरवून रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) चौकीत नेण्यात आले. रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, या कोणाकडेही प्रवासाचे वैध तिकीट किंवा साधे प्लॅटफॉर्म तिकीटही नसल्याचे समोर आले. परिणामी, नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीकडून ३,००० रुपये याप्रमाणे १२ जणांकडून एकूण ३६,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या लोकांकडे प्लॅटफॉर्म तिकीटही नव्हते आणि ट्रेनमध्ये अडकल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंड वसूल केल्यानंतर या सर्वांना सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले. असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.