जगभरात 'वंदे भारत'चा डंका.! कॅनडासह 'हे' देश खरेदीसाठी उत्सुक

ट्रेनची किंमतीसह वेग ठरताेय लक्षणीय
vande bharat
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माेदी सरकारच्‍या महत्त्‍वाकांक्षी मेक इन इंडिया उपक्रमातून साकारलेल्‍या वंदे भारत ट्रेन आता जगभरासाठी लक्षवेधी ठरली आहे. देशभरात या ट्रेनची लोकप्रियेता वाढत असतानाच कॅनडासह चिली, मलेशिया या देशांनी वंदे भारत ट्रेन खरेदीसाठी स्वारस्य दाखवले आहे.

वंदे भारत ट्रेनची बांधणी कमी खर्चात

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जगभराला वंदे भारत ट्रेनची भुरळ पडण्‍याचे कारण म्‍हणजे याची कमी किंमत हे आहे. अन्‍य देशांमध्‍ये अशाच प्रकराची ट्रेन तयार करण्‍यासाठी सुमारे १६० ते १८० कोटी रुपये खर्च येतो. तर वंदे भारत ट्रेनची किंमत सुमारे १२० ते १३० कोटी रुपये आहे.

जपानच्‍या बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेग!

मीडिया रिपोर्टनुसार, वंदे भारत लक्षवेधी ठरण्‍यामागील आणखी एक कारण म्‍हणजे ही ट्रेन 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग गाठण्यासाठी फक्त ५२ सेकंद लागतात. हा वेग जपानच्या बुलेट ट्रेनपेक्षा जास्त आहे. जपानच्या बुलेट ट्रेनला ताशी 0-100 किमीचा वेग गाठण्यासाठी ५४ सेकंद लागतात. तसेच ही ट्रेन विमानापेक्षा शंभरपट कमी आवाज करते. त्‍याचबरोबर ऊर्जेचा वापर खूपच कमी असतो.

भारतात वंदे भारत ट्रेन ४० हजार किलोमीटरपर्यंत विस्‍तारण्‍याचे लक्ष्‍य : रेल्‍वेमंत्री

रेल्‍वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी (दि. २७ सप्‍टेंबर) माध्‍यमांशी बोलताना सांगितले की, केंद्र सरकारने मागील १० वर्षांमध्‍ये ३१ हजार किलोमीटरहून अधिक ट्रॅक जोडण्यात आले आहेत. आता ४० हजार किलोमीटरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. दहा हजार लोको आणि ९ हजार ६०० किलोमीटर ट्रॅकसाठी निविदा जारी करण्यात आल्याची माहितीही त्‍यांनी दिली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news