Maha Kumbh Mela : उत्तर प्रदेशला मिळणार 2 लाख कोटी

महाकुंभ मेळ्यासाठी देश-विदेशातून 40 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता
Uttar Pradesh will get 2 lakh crores
उत्तर प्रदेशला मिळणार 2 लाख कोटी Pudhari File Photo
Published on
Updated on

प्रयागराज : महाकुंभ मेळ्यासाठी देश-विदेशातून 40 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि रशियाच्या लोकसंख्येहून अधिक भाविक या महाउत्सवात सहभागी होणार आहेत. या महाकुंभ मेळ्यातून उत्तरप्रदेश सरकारला दोन लाख कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. 40 कोटी भाविकांनी सरकारी पाच हजार रुपये खर्च केल्यास सरकारला 2 लाख कोटींवर उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. भाविकांनी सरासरी दहा हजार खर्च केल्यास सरकारला 4 लाख कोटींवर महसूल मिळेल, असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भाविकांसाठी पवित्र संगमाच्या काठावर 1,50000 छावण्या उभा करण्यात आल्या आहेत. भोजनासाठी 3 हजार किचन्स, विश्रांतीसाठी 1,45000 रेस्ट रूम आणि 99 पार्किंग लॉट तयार करण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्थेसाठी 40 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. 2700 एआय नियंत्रित कॅमेरे आणि ड्रोन्स बसविण्यात आले आहेत.

मॉक ड्रिल अन् थरार..

एनएसजी कमांडोंनी प्रयागराज महाकुंभमध्ये जमीन, आकाश आणि पाण्यावर तालीम केली. संगम येथे स्पीड बोटीतून उतरलेल्या कमांडोंनी ओलिसांची सुटका केली. मॉक ड्रीलमध्ये एनएसजी, यूपी एटीएस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि जल पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. हा संयुक्त सराव 9 तास चालला. बोट क्लबमध्ये झालेल्या मॉक ड्रीलमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीला तोंड देण्याचा सराव करण्यात आला. महाकुंभात एनएसजीच्या पाच विशेष तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. 7 हेलिकॉप्टरही तैनात करण्यात येणार आहेत.

मांदियाळीने विदेशी माध्यमे अचंबित

महाकुंभमेळ्यासाठी सुमारे 40 कोटींहून अधिक भाविक सहभागी होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या निमित्ताने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह जगभरातील माध्यम समूह प्रयागराजमध्ये एकत्र आले आहेत. या महाकुंभ कार्यक्रमाबाबत परदेशी माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत आहेत. काही वृत्तवाहिन्यांनी या कार्यक्रमाच्या व्याप्तीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आह. जाणून घऊया विदेशातील माध्यम समूहांनी महाकुंभमेळ्याच्या वार्तांकनाविषयी...

अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा अधिक भाविक...

असोसिएटेड प्रेस आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, उत्तर प्रदेश राज्यात पुढील 45 दिवसांमध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा (सुमारे 34 कोटी) जास्त लोक (अंदाजे 40 कोटी) या महाकुंभात स्नान करण्यासाठी पोहोचणार आहेत. सौदी अरेबियातील मुस्लिमांसाठी पवित्र स्थळे असलेल्या मक्का आणि मदीना येथे दरवर्षी हजसाठी जाणार्‍या 20 लाख लोकांपेक्षा हे 200 पट जास्त आहे. हा कार्यक्रम प्रशासनानसाठी एक मोठी परीक्षा असेल. भारतीय संस्कृती हिंदू धर्मापासून वेगळी नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news