भयंकर..! उत्तर प्रदेशात हॉटेलमध्ये मुलानेच केली आईसह 4 बहिणींची हत्या

UP Murder News : कौटुंबिक कलह बनले हत्येचे कारण!
Murder In Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात हॉटेलमध्ये मुलानेच केली आईसह 4 बहिणींची हत्याPudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका हॉटेलमधून चार मुली आणि त्यांच्या आईचे मृतदेह सापडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चार मुलींपैकी दोन मुली अल्पवयीन आहेत. तर, दोघांची वय 18 आणि 19 वर्षे आहे. लखनौच्या हॉटेलमध्ये झालेल्या या 5 खूनांमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मुलानेच आई आणि चार बहिणींची हत्या केल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लखनऊच्या नाका पोलीस स्टेशन परिसरात घडली. आग्रा येथील रहिवासी असलेले हे कुटुंब लखनऊमधील हॉटेल शरणजीतमध्ये थांबले होते. या घटनेनंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून समोर आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

कौटुंबिक कलह बनले हत्येचे कारण!

अर्शद (वय.24) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर आलिया (वय. 9), अल्शिया (वय.19), अक्सा (वय.16), रहमीन (वय.18)आणि अस्मा असे मृत आईचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याचे कुटुंबियांशी काही कारणावरून वाद होत होते, त्यामुळेच त्याने हा गुन्हा केला आहे. आरोपी अर्शद हा मूळचा इस्लाम नगर, टिहरी बगिया, आग्रा येथील कुबेरपूरचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news