Dowry Case: हुंड्यासाठी चक्क किडनीची मागणी अन् सासरच्यांकडून छळ; लग्नानंतर पतीचं काळं सत्य आलं समोर, पीडितेची पोलिसांत धाव

लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीला सासरच्यांकडून अमानवीय वागणूक मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dowry Case
Dowry Casefile photo
Published on
Updated on

UP crime news

कानपूर: ३० लाख रुपये हुंडा दे, नाहीतर आजारी पतीला स्वतःची किडनी दान कर, असा तगादा लावत सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा आरोप एका २४ वर्षीय विवाहितेने केला आहे. कानपूरमधील चकेरी भागात ही घटना घडली असून, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Dowry Case
Abortion Case : तिसरीही मुलगीच असल्याने सासरच्यांनी घरातच केला गर्भपात

कानपूरमधील चकेरी येथील या तरुणीचा विवाह जून २०२३ मध्ये लखनऊ येथील एका तरुणाशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच तिला पतीच्या गंभीर आजाराची माहिती मिळाली. पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून २०२२ पासून तो डायलिसिसवर आहे, ही बाब सासरच्यांनी लग्नापूर्वी लपवून ठेवली होती. याशिवाय, पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.

माहेरून ३० लाख रुपये आण आणि नाहीतर किडनी दे...

११ ऑक्टोबर २०२४ रोजी जेव्हा पीडितेने पतीच्या प्रकृतीबाबत आणि लपवून ठेवलेल्या आजाराबद्दल सासरच्यांना जाब विचारला, तेव्हापासून तिचा छळ करू लागले. सासरच्यांनी तिला मारहाण करत माहेरून ३० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. पैसे नसतील, तर पतीला तुझी किडनी दान कर, असा तिच्यावर दबाव टाकण्यात आला. या छळाला कंटाळून अखेर पीडितीने सासरचे घर सोडले.

"पीडितेच्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींनी तिचे दागिनेही जबरदस्तीने काढून घेतले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, चौकशीअंती पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल."

अजय प्रकाश मिश्रा, पोलीस ठाणे प्रभारी

Dowry Case
Solapur dowry harassment: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news