Lucknow train plot foiled |लखनौमध्ये रेल्वे उडवण्याचा कट उधळला

आयएसआय संबंधित चार संशयितांना अटक
Lucknow train plot foiled |लखनौमध्ये रेल्वे उडवण्याचा कट उधळला
Published on
Updated on

लखनौ; वृत्तसंस्था : लखनौमध्ये रेल्वेचे सिग्नल बॉक्स उडवून मोठा अपघात घडवण्याचा पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचा मोठा कट उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने उधळून लावला आहे. या प्रकरणी मेरठचा रहिवासी साकिब ऊर्फ डेविलसह चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. साकिब हा थेट पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होता. त्याला तिथून मोठ्या प्रमाणावर फंडिंग मिळत होते.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी केवळ रेल्वेच नव्हे तर लखनौ, गाझियाबाद आणि मेरठमधील अनेक महत्त्वाची ठिकाणे तसेच वाहनांच्या शोरूमची टेहळणी केली होती. या ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी पाकिस्तानातील हँडलरला पाठवले होते. गॅस सिलिंडरने भरलेले ट्रक आणि गाड्यांच्या शोरूममध्ये आग लावून जीवित व वित्तहानी करण्याचा त्यांचा इरादा होता. रेल्वे सिग्नल बॉक्स जाळून रेल्वे वाहतूक विस्कळीत करणे आणि अपघात घडवणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.

पाकिस्तानी हँडलर या तरुणांना गुगल लोकेशनचे स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवून लक्ष्य निश्चित करून देत असे. साकिब आणि त्याच्या साथीदारांना ओसामा बिन लादेन आणि गझवा ए हिंदच्या नावाने चिथावणी देऊन दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त केले जात होते. साकिबचे शस्त्रास्त्रांसह सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ पाहून लोकेश ऊर्फ पपला आणि विकास ऊर्फ रौनक हे त्याच्या संपर्कात आले होते. अटकेत असलेल्या इतर तिघांना साकिबच्या माध्यमातूनच पैशांचा पुरवठा केला जात होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news