Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा
union minister ashwini vaishnaw announced mithun chakraborty will get dadasaheb phalke award 2024
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीरFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. या ज्येष्ठ अभिनेत्याला त्याच्या उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवासासाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, असे त्यांनी XPost ला सांगितले. 74 वर्षीय मिथुन चक्रवर्ती यांची हिंदी चित्रपटसृष्टीत 48 वर्षांची यशस्वी कारकीर्द आहे. ते अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. (mithun chakraborty)

मिथुन दा यांचा चित्रपट सृष्‍टीतील प्रवास प्रेरणादायी

अश्विनी वैष्‍णव म्‍हणाले, मिथुन दा यांचा चित्रपट सृष्‍टीतील उल्‍लेखनीय प्रवास पिढ्‍यांना प्रेरित करत आला आहे. दादासाहेब फाळके निवड ज्युरीने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे, हे जाहीर करणे गौरवास्पद आहे अशी भावना त्‍यांनी व्यक्‍त केली. 8 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पद्मभूषण पुरस्कारानेही गौरव

कोलकात्याच्या रस्त्यांपासून ते बॉलीवूड डिस्को डान्सर बनण्यापर्यंतचा प्रवास मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी सोपा नव्हता. चित्रपट क्षेत्रातील या उंचीवर पोहोचण्याच्या त्‍यांच्या प्रवासात त्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याची बातमी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याच्या काही महिन्यांनंतर आली आहे. एप्रिलमध्ये ज्‍येष्‍ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना राष्‍ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्‍ते सन्मानित करण्यात आले होते.

'या' चित्रपटांमध्ये मिथुनदा यांचा दबदबा 

अलीकडच्या काळात ते 'ओह माय गॉड' सारख्या चित्रपटात दिसले. याशिवाय त्यांच्या यशस्वी चित्रपट कारकिर्दीत 'अग्निपथ', 'मुझे इंसाफ चाहिये', 'हम से है जमाना', 'पसंद अपनी अपनी', 'घर एक मंदिर' आणि 'कसम पैदा करने वाले की' आणि इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

दादासाहेब फाळके पुरस्‍कार जाहीर झाल्‍यावर ज्‍येष्‍ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. माझ्याकडे शब्‍द नाहीत. मला हसताही येत नाही किंवा रडताही येत नाही, इतकी मोठी ही गोष्‍ट असल्‍याचं त्‍यांनी म्‍हटलंय. मी कल्‍पना करू शकत नाही. हा पुरस्‍कार मी माझ्या कुटुंबाला आणि जगभरातील माझ्या चाहत्‍यांना समर्पित करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news