Sword Attack Case | लघुशंकेस विरोध केल्याने काका-पुतण्यावर तलवार हल्ला; मान कापली गेल्याने पुतण्याचा मृत्यू

Sword Attack Case |
Sword Attack Case | लघुशंकेस विरोध केल्याने काका-पुतण्यावर तलवार हल्ला; मान कापली गेल्याने पुतण्याचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

झाशी : घराजवळ असलेल्या हॉटेलमध्ये काम करणारे कामगार मद्यपान करून तिथेच लघुशंका करतात, याला विरोध करून तक्रार केल्याच्या रागातून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या काका-पुतण्यावर तलवार हल्ला केला. त्यात पुतण्याची मान कापली गेल्याने त्याचा मृत्यू झाला, तर काकाची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

गौरीशंकर कुशवाहा (वय ४५) असे मृताचे नाव आहे. काका मुरारीलाल कुशवाहा (६५) यांच्यावर उपचार सुरू आहेत. काका-पुतण्या पॉवरहाऊसवरून परत येत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या तिघा भावांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात काका-पुतण्या रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. आरडाओरड ऐकून कुटुंबीय तेथे पोहोचले. घटनेची माहिती मिळताच पोलिस रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. दोघांनाही मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.

घटनास्थळाचे दोन व्हिडिओही समोर आले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की रक्ताने माखलेल्या गौरीशंकरचे डोके मांडीवर घेऊन पत्नी सुमन रडत आहे. आजूबाजूला फक्त रक्तच रक्त पडले आहे. पत्नी रडत रडत नातेवाईकांना फोन लावण्यास सांगत आहे. मुलगी म्हणत आहे- बाबांना मारले, बाबा उठा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये रक्ताने माखलेला मुरारीलाल खाटेवर झोपलेला आहे. घरातील लोक रुग्णवाहिका आणि पोलिसांना फोन करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news