Ujjwala Yojana LPG Subsidy: उज्ज्वला योजनेत मोठा बदल; सबसिडी LPG सिलिंडरची संख्या 9 वरून 4 वर, लाभार्थ्यांना फटका

गॅस दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय; वार्षिक वापर लक्षात घेऊन सबसिडी मर्यादा कमी
LPG
LPGPudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली: केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतीच्या (सबसिडी) एलपीजी सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे. आता लाभार्थ्यांना वर्षाला ९ ऐवजी केवळ ४ सबसिडी सिलिंडर मिळतील.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण माल खनूजा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उज्ज्वला कुटुंबांचा सरासरी वार्षिक गॅस वापर लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मे २०१६ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत सुरुवातीला १२ सिलिंडर मिळत होते, जे गेल्या वर्षी ९ आणि आता ४ वर आणले आहेत देशात एलपीजीचे दर सातत्याने वाढत असतानाच हा निर्णय घेण्यात आला.

७ जून रोजी गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली, ज्यामुळे दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या तीन महिन्यांत गॅस तब्बल ८९ रुपयांनी महागला आहे.

खनूजा यांच्या मते, सरकारला एका सिलिंडरचा पुरवठा खर्च १६०० रुपये येतो, त्यामुळे सबसिडीसह लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर सुमारे १००० रुपयांची अप्रत्यक्ष मदत मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news