'उडता पंजाब' समोर 'आईस'चे आव्हान

पाकिस्तानी तस्करांकडून नव्या अमली पदार्थाचे मोफत वाटप
'Udta Punjab' faces the challenge of 'Crystal meth'
'उडता पंजाब' समोर 'आईस'चे आव्हान File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंजाबमधील तरुणांना व्यसनाच्या जाळ्यात ओढण्यासाठी तस्करांनी हेरॉईनच्या पाकिटांसोबत मोफत 'आईस' (क्रिस्टल मेथ) वाटप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ते रोखण्याचे मोठे आव्हान सुरक्षा यंत्रणांपुढे उभे राहिले आहे.

'आईस' (आयईसी) किंवा क्रिस्टल मेथ, सामान्यतः एक कृत्रिम औषध असते. परंतु, आता पुरवठा होणारे 'आईस' वनस्पतीआधारित असून, अफगाणिस्तानातून येते. हे एफेड्रा नावाच्या वनस्पतीपासून तयार केले जाते, जी त्या भागात मोठ्या प्रमाणावर आढळते. हे अफगाण बनावटीचे 'आईस' अधिक स्वस्त आणि सहज उपलब्ध होते.

तालिबानने २०२१ पासून अफगाणिस्तानमध्ये अफूच्या शेतीवर बंदी आणल्यामुळे हेरॉईनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. हेरॉईन हे रासायनिक प्रक्रियेद्वारे अफूपासून तयार केले जाते. अफूच्या उत्पादनात तब्बल ७० टक्के घट झाली असून, तस्कर सध्याच्या साठ्यावर अवलंबून आहेत.

पाकिस्तानमधील तस्कर, जे पूर्वी अफगाणिस्तानमधून हेरॉईन पुरवत होते, ते आता हेरॉईनच्या पाकिटांसोबत मोफत 'आईस' देत आहेत. २०२४ मध्ये पंजाब पोलिसांनी विक्रमी २२ किलो 'आईस' जप्त केले, जे २०२३ मध्ये जप्त केलेल्या २ किलोच्या तुलनेत ११ पट अधिक आहे. गेल्या पाच दिवसांत विशेष अंमली पदार्थविरोधी मोहिमेत आणखी २ किलो 'आईस' जप्त करण्यात आले आहे.

व्यापारामागे पाकिस्तानमधील मोठा तस्कर

जगातील सर्वात मोठ्या अमली पदार्थ तस्करांपैकी एक पाकिस्तानस्थित प्रसिद्ध ड्रग्ज माफिया हाजी सलीम ऊर्फ हाजी बलोच हा 'आईस'च्या मोठ्या पुरवठ्यामागे असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तो जागतिकस्तरावर मोठे नेटवर्क चालवतो आणि आता त्याचे लक्ष अफगाणिस्तानमध्ये उत्पादित 'आईस'कडे वळले आहे.

'आईस' १० पट स्‍वस्‍त

'आईस' हे आंतरराष्ट्रीयस्तरावर हेरॉईनच्या तुलनेत १० पट स्वस्त आहे आणि त्याच्या सेवनासाठी लागणारी मात्रा खूपच कमी आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, 'आईस' अनेकदा ड्रोनच्या माध्यमातून हेरॉईनबरोबर पाठवले जात आहे. अटक केलेल्या तस्करांच्या चौकशीतही हे स्पष्ट झाले आहे की, 'आईस' मोफत वाटप करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news